<
कानळदा/जळगाव(प्रतिनीधी)- ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या आई ‘राजमाता जिजाऊ’ व तरुणांचे प्रेरणास्थान व ज्यांनी हिंदू धर्माची पताका सातासमुद्रापार नेली असे ‘स्वामीविवेकानंद’ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक के.पी.चव्हाण विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एन.एच.बाविस्कर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामीविवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. सांस्कृतिक उपविभाग प्रमुख आर.व्ही.पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेत शिवबांना घडविण्यात जिजाऊंची तेजस्वी भूमिका व हिंदू धर्माच्या वाटचालीत विवेकानंदांचे योगदान याची ओळख करून दिली. याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक के.एम.विसावे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार व्ही.जे.पवार यांनी मानले.