Wednesday, July 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती विशेष लेख

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2020
in राष्ट्रीय, लेख
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- श्री शक्ती आणि राष्ट्रशक्तीचा प्रतीक असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. शहाजी जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी राजे यांनी स्वतःच्या घरादाराची आणि प्राणांची पर्वा न करता स्वराज्यनिर्मीतीच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतला होता त्यांच्या जीवनात अनेक संकटे येऊनही ते कर्तव्याशी प्रामाणिक राहिले म्हणूनच स्वराज्याचे स्वप्न साकार झाल. स्वराज्यनिर्मीतीच्या खडतर अशा कार्याला मासाहेब राजमाता जिजाऊ सारखे खंबीर नेतृत्व आणि कृतिशील मार्गदर्शन लाभल्यामुळे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरले. स्वराज्यातील शेतकरी-शेतमजूर मावळ्यांनी रयतेला आऊसाहेबांचा जिव्हाळा लागला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत आऊसाहेब जिजाऊ स्वतः राज्यकारभार पाहात होत्या. “राजामध्ये श्रेष्ठ असलेले क्षत्रिय मालोजीराजे यांचे पुत्र जे क्षेत्रीय शहाजीराजे यांची पत्नी असलेली महा साध्वी विजय वर्धिनी जिजाऊ हि यादव राजा नंदिनी आनंद देणारी कन्या पृथ्वीतलावर जागृत आहे.” डॉ. आ. ह. साळुंखे यांनी ‘शिवराय संस्कार आणि शिक्षण’ या पुस्तकात शिवभारत ग्रंथातील जिजाऊंचे व्यक्तिचित्र मांडले आहे यातून समकालीन साधनात जिजाऊंच्या महानतेची रेखाटलेली ऐतिहासिक साध्य प्रतिमा नजरेसमोर येते व या विजय वर्धिनी मातृशक्ती समोर मन व मस्तक नतमस्तक होते. राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे झाला. म्हाळसा राणी व लखुजीराजे जाधव यांची ती कन्या होती. ०६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. स्वकीय, परकीय, धार्मिक सर्व प्रकारच्या शत्रूंवर मात करत शिवाजी महाराज ‘छत्रपती’ झाले. पाठीमागे दुर्गा, भवानी व प्रेरक शक्ती म्हणून जिजाऊ होत्या. अनेक कसोटीच्या प्रसंगी जिजाऊ अत्यंत धीराने व धाडसाने वागल्या. शिवबाच्या मनात पेटवलेली स्वराज्याची ज्योत त्यांनी कायम ठेवली. स्वतः शिवबाला रयतेच्या छत्रपती करण्याचे स्वप्न जिजाऊंनी प्रत्यक्षात आणले. आपल्या मुलांना सर्व प्रकारचे संस्कार करून माता गुरू व मार्गदर्शक प्रेरणा बनल्या. शिवरायांना छत्रपती पदावर आरूढ करून त्यांनी आपला संकल्प पूर्ण केला. त्यानंतर १७ जून १६७६ ला या जगाचा निरोप घेतला. एकंदर ७६ वर्षांचे आयुष्य जिजाऊंना लाभले. शहाजी राजांचा मृत्यू २३ जानेवारी १६६४ ला झाला. तत्कालीन पती निधनानंतर सती जाण्याची प्रथा नाकारून जिजाऊ शिवबा व रयतेच्या कल्याणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहील. या शहाजीराजांच्या नंतर दहा वर्ष त्या जिवंत होत्या स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाल्यावरच अत्यंत समाधानाने त्यांनी आपला देह ठेवला. स्वराज्य माता जिजाऊ या सिंधू संस्कृतीतील नित्रत्तीच्या वारसा चालवणार्‍या महानायिका आहेत. वीर कन्या, वीरपत्नी, वीर स्त्री, वीर माता, वीर शिवाजी, वीर प्रेरिका, वीर ज्ञानी, वीर महाराणी, वीर भगिनी, वीर स्नुषा असणारे ते एकमेव व्यक्तिमत्व आहे. जिजाऊ या केवळ शिवरायांच्या मातोश्री नाहीत तर मानवांच्या प्रेरिका आहेत. जिजाऊंचे हे प्रेरक एक रूप समजून घेऊन वर्तमानात वाटचाल करण्याची गरज आहे. आज जात, धर्म, भाषा, प्रांत यावरून माणसामाणसात गट पडले आहेत. माणूस माणसाचा शत्रू बनत असून एकंदर वातावरण चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर महामानवांचे विचार समाजाला एकसंघ करू शकतात. ज्ञानाचे शिखर गाठण्यासाठी वर्तमाना ची लढाई लढावी लागेल. ढाल तलवारीची लढाई नाही तर प्रबोधन, परिवर्तन व ज्ञानाची आहे. त्यातून जिजाऊंना अभिप्रेत एकमय समाज निर्माण करता येईल. जिजाऊंना शहाजीराजांनी १२ वर्षांच्या शिवाजी राजे सोबत पुण्याला पाठवले. भगवा झेंडा, राजमुद्रा व आवश्यक साधने, माणसे दिली. जवणी पुढील काळात शिवाजी राजे सोबत सावलीसारखे वास्तव्य केले. पाठराखण व संस्कार केले. धर्माच्या भिंती पाडून सर्व घटकातील सवंगड्यांची मोठे बांधली, त्यांना शिवरायांचे सहकारी बनवले. सामान्य सहकारी, मावळे यांना प्रेरणा देऊन महायज्ञ बनवले छत्रपती शिवरायांनी बरोबर संभाजी राजांना घडवून आणण्यासाठी खूप मोलाचा वाटा जिजाऊंनी उचलला ही गौरवाची बाब आहे. जिजाऊंचे वडील लखुजीराव प्रचंड धाडसी आणि पराक्रमी होते तर आई माळसाबाई सुद्धा अत्यंत धोरणी स्वाभिमानी वसाहती होत्या आई-वडिलांचा अलौकिक गुणांचा वारसा जिजाऊनी आयुष्यभर जोपासला.त्या काळातील रूढी परंपरेला अनुसरून वयाच्या तेराव्या वर्षी जिजाऊंचा विवाह वेरूळ येथील मालोजीराव भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे यांच्याशी दौलताबाद येथे थाटामाटात करण्यात आला. शिवाजी राजे मोहीमांवर असतांना शासन प्रशासनाची सर्व सूत्रे जिजाऊंनी सांभाळली. स्त्रियांना स्वातंत्र्य, जात-धर्म भेद्यांना नकार, सुप्रशासन, शेतकऱ्यांची काळजी, कलाकारांचा सन्मान, अंधश्रद्धा व कुपप्रथांना थारा नाही. सज्जनांचे रक्षण, नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण, योग्य न्यायदान, वेळ प्रसंगी प्रत्यक्ष युद्धात सहभाग, धर्ममार्तंडांना न जुमानता परधर्मात गेलेल्या लोकांना परत धर्मात घेऊन सन्मान, जमीन व जल यांचे संवर्धन, उत्तम आर्थिक नियोजन, एकमेकांबद्दल विश्वास, दुष्टांना शासन व प्रेम इत्यादी गोष्टी जिजाऊंनी केल्या. त्या काळाच्याही पुढे जाणाऱ्या होत्या. त्यांनी राबवलेले सुप्रशासन सर्वकाळ कोणत्याही लोकशाही व्यवस्थेला मार्गदर्शक ठरणारे आहे यात तिळमात्र शंका नाही. त्यांच्या प्रशासकीय व लोककल्याणकारी कारभाराचा सविस्तर अभ्यास होण्याची आहे. त्यानुसार वाटचाल करण्याचा आपला संकल्प हीच खरी  जिजाऊंना खरी वंदना आहे. शाहीर पिराजीराव सरनाईक यांचे शब्द यतार्त आहेत. जिजाऊंना एकूण सहा अपत्ये झाली मात्र त्यापैकी संभाजीराजे आणि शिवाजीराजे हेच दीर्घायुषी ठरले. सुपुत्र संभाजीराजांचा जन्म १६२१ च्या दरम्यान झाला असावा असा तर्क काल आणि अस्सल कागदपत्रांवरून उल्लेखावरून लक्षात येतो. दुसरे पुत्र छत्रपती शिवाजीराजे यांचा जन्म १९ फेब्रुवारी सोळाशे ३० ला शिवनेरी किल्ल्यावर झाल्याच सिद्ध आहे. श्री शक्ती मातृशक्तीची सर्वोच्च प्रतीक असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ व सकल मराठा समाजाने आज मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे करोडोंच्या संख्येने नमन करण्यात येणार तसेच राज्यात देशात ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सव उत्साहाततसेच राज्यात देशात ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीच्या वतीने त्रिवार कोटी कोटी नमन आणिअभिवादन. तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय यातच सर्वकाही येत.आई जिजाऊ वंदन माझे, तुझिया चरणालातुझ्याच पोटी वीर छत्रपती शिवाजी, आले जन्मालाआऊसाहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या आदर्श माता प्रेरणादायी संस्कार पीठ होते. त्या सदैव सर्वांच्या अंतकरणात व स्मरणात राहतील.मासाहेब जिजाऊ जयंती निमित्त कोटी कोटी नमन.

किशोर पाटील कुंझरकरराज्य समन्वयक राज्य समन्वय समिती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य ७०३०८८७१९०

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आदर्श विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Next Post

शिक्षणासोबतच व्यसनमुक्त पिढी घडवणे शाळेची जबाबदारी -विजय पवार

Next Post
शिक्षणासोबतच व्यसनमुक्त पिढी घडवणे शाळेची जबाबदारी -विजय पवार

शिक्षणासोबतच व्यसनमुक्त पिढी घडवणे शाळेची जबाबदारी -विजय पवार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications