<
दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत कार्यशाळेचे
जळगांव(प्रतिनीधी)- प.न.लुंकड कन्या शाळेत शनिवार दिनांक ११रोजी दप्तर मुक्त शनिवार या अंतर्गत विविध कार्यशाळा घेण्यात आल्या, त्यात सर्व प्रथम इ.५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनींसाठी बेसिक गणित कार्यशाळा घेण्यात आली. नंतर मकरसंक्रांतिचे औचित्य साधत वर्तमानपत्रापासून पतंग बनवणे व कागदी पिशव्या बनवणे कार्यशाळा घेण्यात आली. मधल्या सुट्टीनंतर भूगोल विषयाचे नकाशे भरणे व नकाशा वाचन ही कार्यशाळा वर्गा वर्गात घेण्यात आली. त्यानंतर स्वतः बनवले पतंग उडवण्याची मज्जा विद्यार्थीनींनी शालेय क्रीडांगणावर घेतली. मुलचं नाही, तर मुलीसुध्दा पतंग उडवू शकतात हे या उपक्रम दिसून आले. गणितीची कार्यशाळा विशाल सपकाळे यांनी घेतली, तर वर्तमान पत्राच्या कागदापासून पतंग बनवणे कार्यशाळा शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका अजंली कुलकर्णी, सुवर्णा जोशी यांनी घेतली. कागदी पिशव्या बनवण्याची कार्यशाळा प्रवीण धनगर यांनी घेतली तसेच भूगोल नकाशे भरणे कार्यशाळेचे नियोजन व्ही.एस पाटील यांनी केले. सदर उपक्रमाचे कौतुक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष सुशीलदादा अत्रे, शिक्षण प्रसारक मंडळाचे चिटणीस अभिजीत देशपांडे, सदस्य प्रेमचंद ओसवाल, सदस्य शरदचंद्र छापेकर, शाळेच्या समन्वयिका पद्मजा अत्रे, रेवती शेंदुर्णीकर यांनी केले. सदर उपक्रमाचे अनमोल मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव, पर्यवेक्षिका स्वाती नेवे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रवीण धनगर यांनी केले तर आभार किशोर चौधरी यांनी मानले. सदर कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षककेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.