<
प्रगती विद्या मंदिरातील शिक्षकाचा अभिनव उपक्रम
जळगाव(प्रतिनिधि)- प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मानवी पचनसंस्था या संकल्पनेविषयी अधिकाधिक माहिती मिळावी तसेच पचनसंस्थेच्या विविध अमूर्त्य भाग जसे ग्रासिका, जठर, यकृत, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे, ग्रंथी, पचकरस, आम्ल, पित्तरस इ. विषयीची माहिती मुर्त्य स्वरुपात मिळावी यासाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती हा प्रकल्प हाती घेऊन पचनसंस्थेची प्रतिकृती सकारली.या शैक्षणिक सहित्याची निर्मिती करत असताना टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेवर भर देण्यात आला असून यात साहित्य म्हणून कोल्ड्रिंकचे दोन टिन, सलाइनची नळी, बिसलेरी पाण्याची बॉटल, जास्मिन तेलची बॉटल, फेविस्टिक की डबी, कापुरची डबी, बेसिनचा पाइप, खराब पाण्याची नळी तसेच कार्डबोर्ड, रंग, कार्डशीट इ. वस्तुंचा उपयोग करून प्रतिकृति सकारली आहे. ही प्रतिकृति बनविन्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना कृतियुक्त तसेच अनुभवातून शिक्षण देने होय तसेच नावनिर्मितीचा आंनद घेत शिक्षण घेणे हा आहे.