<
विशिष्ट शैलीतून बुद्ध जीवनावर आधारित चित्रांचा “चित्रकार दिनदर्शिकेत” समावेश
जळगाव(प्रतिनीधी)- शहरात कार्यरत असलेल्या उल्का फाउंडेशन च्या अभिनव संकल्पनेतून यावर्षीही “चित्रकार दिनदर्शिका” साकारली गेली आहे. जळगाव जिल्ह्यातील कलाशिक्षक श्याम कुमावत यांच्या विशिष्ट शैलीतून बुद्ध जीवनावर आधारित चित्रांचा “चित्रकार दिनदर्शिकेत” समावेश करण्यात आला आहे. सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री मा.गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. या प्रसंगी ते म्हणाले की मला आनंद आहे की, अभिनव संकल्पनेतून साकारलेली “चित्रकार दिनदर्शिकेचे” प्रकाशन यावर्षी माझ्या हस्ते होत आहे, उल्का फाउंडेशन व चित्रकारांना खुप खुप शुभेच्छा. प्रकाशन प्रसंगी उद्योजक श्रीरामभाऊ खटोड, नंदुजी अडवाणी, डॉ.राधेश्याम चौधरी, दीपक तायडे, अरविंद देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे कौतुक स्थानिक चित्रकारांकडून होत आहे. उपक्रमास ,थेपडे स्कूलचे संचालक केदार पी.थेपडे, त्रिमूर्ती आर्ट फाऊंडेशनचे संचालक सुशील चौधरी, सुचादी गिफ्टचे संचालक सुनील डोईफोडे, द ग्लासचे संचालक नितीन नेरकर, एम मार्ट डिझाईन स्टुडीओ चे संचालक मुनेश ढाके यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर दिनदर्शिकेे ची सजावट आणि संकल्पना यासाठी कलाशिक्षक दिनेश पाटील, स्वप्नील पाटील, अविनाश घुगे, दीपक बोरसे, यांनी परिश्रम घेतले “चित्रकार दिनदर्शिका ही मोफत असून मिळविण्यासाठी उल्का फाउंडेशन च्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भूषण निनाजी वले यांनी केले आहे.