महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वृत्तवाहिनी विभागाच्या जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील तर जिल्हाकार्यध्यक्ष पदी संतोष ढिवरे यांची निवड;पुष्पगुच्छ देऊन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले अभिनंदन
जळगाव-(प्रतिनिधी)-प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे,वृत्तवाहिनी प्रदेश अध्यक्ष रणधीर कांबळे, राज्य संघटक संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे,प्रदेश प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वृत्तवाहिनी विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी आवाज मराठी न्यूज चॅनल चे संपादक अभिजित पाटील तर जिल्हाकार्यध्यक्ष सायदैनिक साईमतचे ऑनलाईन विभागाचे प्रमुख संतोष ढिवरे यांची निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित दोन्ही पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अभिनंदन केले. पद निवडीच्या भावी वाटचालीस सायदैनिक साईमतचे संपादक प्रमोदजी ब-हाटे , डाॕ. अण्णासाहेब जीडीबेंडाळे मासमिडिया विभाग प्रमुख डाॕ.जयंत लेकुरवाळे ,प्रा. संतोष सोनवणे , प्रा.विकास भदाणे, आयाज मोहसिन , सुनिल भोळे , राजिव गागड , भुषण महाजन यांनी शुभेच्छा दिल्या . यावेळी जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, जिल्हाकार्यध्यक्ष शरद कुलकर्णी, शैलेश पाटील, चेतन निंबोळकर आदी पत्रकार मंडळी उपस्थित होती.