Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न संचलनात सामील होणार विविध शासकीय योजनांवर आधारित चित्ररथ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७० व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत २६ जानेवारी, २०२० रोजी  सकाळी  ९.१५ वाजता होणार आहे. यावेळी होणाऱ्या संचलनात राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान, स्वच्छ भारत अभियान, आरोग्य सेवांसह इतर विभागांच्या विविध शासकीय योजनांवर आधारित चित्ररथ सामील करावे. तसेच शहरातील शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्या.

            प्रजासत्ताक दिन समारंभाची पूर्वतयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ पंजाबराव उगले, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जळगावच्या उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, सहायक आयुक्त, समाजकल्याण योगेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसीलदार वैशाली हिंगे, माणिक आहेर, पोलीस निरिक्षक दिलीप पाटील, यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, शिक्षण, एनसीसी, कामगार व इतर विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचा समारंभ नीटनेटका होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी बैठकीत दिल्या.        

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पोलिस कवायत मैदानावर

Next Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

Next Post
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo