<
निमजाई फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम ;बाल निरिक्षण गृहातील चिमुकल्यांसोबतही वाढदिवस करणार साजरे
जळगाव- निमजाई फाउंडेशतर्फे समाजाच देण लागत याप्रमाणे दरवर्षी गोर-गरीबांना अन्नदान, निराधारांना निवासाची सोय, वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. बाल निरिक्षण गृहातील मुले तसेच आशादीप वसतीगृहातील महिला या सण, आनंदापासून वंचित असतात. त्यांना आनंद मिळावा भावेनेतून फाऊंडेशनत उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात फाऊंडेशनमध्ये काम करणार्या प्रत्येेक कर्मचारी, सदस्यांचा वाढदिवस बाल निरिक्षक गृहातील मुलांसोबत साजरा करण्यात येणार आहे. तसेच मकससंक्रातीनिमित्ताने आशादीप वसतीगृहातील महिलांना साड्या वाटप करण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमांमधून फाउंडेशन निराधार बालकांसह महिलांसोबत आपला आनंद साजरा करणार असल्याची माहिती माहिती निमजाई फाउंडेशनच्या अध्यक्षा शितल पाटील (भाक्षे) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महिला, तरुणींना रोजगार उपलब्ध करुन देणार
पत्रकार परिषदेला निमजाई फाउंडेशनचे सचिव भूषण बाक्षे, समन्वयक दिपक जावळे उपस्थित होेते. शैक्षणिक उपक्रमासोबत फाउंडेशनतर्फे गेल्या वर्षी सैनिक भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना अन्नदान करण्यात आले होते. तसेच बेटी बचाव बेटी पढाओ या शासनाच्या महत्वाची उपक्रमांबाबतही फाऊंडेशतर्फे जनजागृती करण्यात येत असते. यावर्षी फाऊंडेशनमधील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस बालनिरिक्षक गृहात साजरा करण्यात येणार आहे. यात तेथील बालकांना खाऊचे वाटप, त्यांच्यासाठी विविध स्पर्धा, स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मकरसंक्रांतीनिमित्ताने आशादीप वसतीगृहात जावून तेथील महिलासोबत हळदीकुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आहे. तसेच त्यांना साड्या वाटप करण्यात येणार आहे. यादरम्यान आनंदा मिळावा, म्हणून लिंबू चमचा, संगीत खुर्ची या स्पर्धा घेणार असल्याचेही शितल पाटील यांनी सांगितले.
महिला, तरुणींना रोजगारक्षम बनविणार
शासनाच्या बेटी बचावो बेटी पढाओ या मोहिमेला हातभार लावाला यामाध्यमातून शासनाच्या कौशल्य विकास अंतर्गत त्यांना विविध प्रकारचे कौशल्याचे प्रशिक्षण द्यावे, तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यावर संबंधित महिला तसेच तरुणी रोजगारक्षम बनाव्यात या उद्देशातून 2015 साली निमजाई फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. यात केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास या योजेनेनुसार फाउंडेशन अंतर्गत महिला तसेच तरुणींसाठी लाखो रुपये फी असलेले फॅशन डिजाईनिंग, ब्युटी पार्लर तसेच हार्डवेअर या कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. अशाप्रकारे आजपर्यंत 500 पेक्षा अधिक जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून या वर्षीय 200 पेक्षा अधिक विद्यार्थीनी प्रशिक्षण घेत आहे. मोठ मोठ्या कपडे बनविणार्या कंपन्यांकडून काम मिळवून महिला तसेच तरुणींना लवकरच रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही शितल पाटील यांनी सांगितले.