<
जळगाव- येथील तहसिलदार यांचे सरकारी गाडीचे सारथ करतांना चक्क तलाठी आप्पा करत असल्याची घटना पाहायला मिळाली. यावरुन असे लक्षात येते की प्रशासनाला कोणाचे काम कोणाला द्यायचे याचा चक्क विसर पडला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकरी कर्जमाफीचे काम सुरु असतांना सदर तलाठी यांना असे आपल्या वाहनावर चालक म्हणून राबविण्याचा तहसिलदारांचा या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.
दरम्यान बर्याच दिवसांपासून जळगाव तहसिलदार सौ.हिंगे यांना सरकारी वाहन चालक मिळाला नसल्याने त्यांनी चक्क आपले शासकीय वाहन चालविण्यासाठी चक्क तलाठी आप्पांना निवडले. देऊळगाव येथील सचिन खेतमाळी या तलाठ्याला त्याची गाडी चालवतांना पाहायला मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान सदर प्रकार हा चुकीचा असून तहसिलदार यांच्याकडून असा प्रकार होत असल्याने हे कायदयाचे उल्लंघन होत असल्याच्या भावना जन माणसातुन व्यक्त होत आहे.