<
लाभार्थी असून देखील अद्यापपर्यंत लाभ मिळाला नाही
धरणगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील नांदेड येथील घरकुल पात्र लाभार्थींसाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजने अंतर्गत नांदेड ग्रामपंचायत मालकीचा गट नंबर १६४०(पुर्वीचा स.न.३६८/अ१) हा ग्रामसभेने १२ डिसेंबर २०१८ मध्ये मंजूर केला व कलेक्टर ने १३ मे २०१९ मध्ये मान्यता दिली. तर २० मे २०१९ ला तहसीलदारांनी भुमिअभिलेख धरणगाव येथील उपअधीक्षक अहिरे यांना पत्र दिले. तसेच १५ जुलै २०१९ मध्ये ग्रामपंचायतीने धरणगांव भुमीअभिलेख उपअधिक्षकांकडे १०, ५०० रूपये मोजणी फी भरुन परत धरणगांव तहसिलदारांनी दोन वेळा पत्रव्यवहार करुन देखील भुमीअभिलेखाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अद्याप पर्यंत मोजणीच्या कामाला सुरवात केली नाही. तसेच या अधिकारी कर्मचाऱ्यांची तक्रार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना देखील केली. तरीही हे अधिकारी कर्मचारी काम करीत नाहीत. असं उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांचे म्हणने आहे. हे काम करताना भूमिअभिलेख खात्यातील अधिकारी व कर्मचारी हे घरकुल पात्र लाभार्थी कडून लाच घेतल्याशिवाय काम करत नसल्याचं त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.