<
जळगाव – (प्रतिनिधी) – शिक्षक सदैव आपल्या कार्याने देशाच्या विकासास योगदान देत असतात यामध्ये ज्या शिक्षकांनी आपल्या स्वतःचे जीवन विद्यार्थ्यांसाठी समर्पित केले व सदैव त्यांच्या विकासाची कास धरली अशा गुणवंत व कर्तृत्ववाण शिक्षकांचे कार्य लक्षात घेऊन प्रथमतः च मनपा समूह साधन केंद्र क्रमांक 9 चे केंद्रप्रमुख डॉ.अशोक सैंदाणे यांनी त्यांच्या केंद्रा अंतर्गत असलेल्या शाळेतील शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्ड देऊन सन्मान केला.
सदर पुरस्कार समारंभ रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी यांच्या विशेष सहकार्याने घेण्यात आला.त्यात निलेश रामराव मोरे (त्र्यंबक नगर प्रा.विद्या.) , किशोर मनोहर राजे (भगीरथ इंग्लिश स्कुल) ,चेतना चंद्रकांत महाजन ( बाहेती प्रा.विद्या.) , उज्ज्वला सतीष जाधव ( कमलाबाई वाणी बालनिकेतन विद्या.) ,तनुजा हरिष तळेले (शेवंताबाई खेमा टोके प्रा.विद्या.) ,इंदिरा रमेशचंद्र अहिरराव (मनपा केंद्र शाळा क्रमांक 38 ) , नंदू यशवंत खरे ( शारदा प्रा.विद्या.) , प्रकाश मोतीराम खैरनार ( नूतन मराठा माध्य.विद्या) ,अशोक सोनू पारधे (भगीरथ इंग्लिश स्कुल) , सुरेखा विश्वास भदाणे (आदर्श अध्यापन सराव पाठशाळा) यांना उपशिक्षणाधिकारी डी. एम.देवांग यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आपण खऱ्या अर्थाने शासनाचे , शाळेचे व विशेषतः विद्यार्थ्यांचे सेवक असून आपण आपल्या कर्तव्याची जाण ठेवून काम करावे.प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा महत्वाचा घटक आहे.आपण भाग्यवान आहोत की आपल्याला शिक्षकाची नोकरी मिळाली.त्यातून आपण खरी देशसेवा करू शकतो.अशा शब्दात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ.डी. एम.देवांग यांनी आपले विचार व्यक्त केले.
त्याचप्रमाणे जळगाव शिक्षक कलामंच तर्फे योगेश भालेराव , मानव भालेराव व निलेश मोरे यांनी या प्रसंगी सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर केला.
प्रसंगी डॉ. तुषार फिरके( असिस्टंट गव्हर्नर रोटरी क्लब झोन 12) , संजय दहाड (अध्यक्ष रोटरी क्लब) , राहुल कोठारी ( सेक्रेटरी गोल्ड सिटी) ,श्याम ठाकरे ( कार्याध्यक्ष खा.प्रा.शिक्षक शिक्षकेतर महासंघ जळगाव जिल्हा ) , गोविंदा लोखंडे ( अध्यक्ष खा.प्रा.शिक्षक शिक्षकेतर महासंघ जळगाव तालुका ) , अजित चौधरी ( सचिव खा.प्रा.शिक्षक शिक्षकेतर महासंघ जळगाव तालुका ) सर्व रोटरिअन तसेच शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.