<
जळगाव (डॉ. धर्मेंश पालवे) – जिल्ह्यात गड्डे सत्र सुरू असतांना आणि त्यावर लोकांचा नाराज सूर ऐकू येत असतानाच जिल्ह्यात राशन दुकानात होणाऱ्या गैर व्यवहारात आता जुनी पण नवीन तऱ्हा पाहायला मिळाली आणि नुसता पाहायला च नाही तर लोकांनी चक्क थेट प्रांताधिकारी कडे तक्रार दाखल करून याची चौकशीही करायला लावा अशी जिल्हा जागृत जनमंच कडे विनंती केली .आणि जनमंच चे माशिवराम पाटील यांनी या गोष्टीचा मागोवा घेत पाठपुरावा केला. सविस्तर असे की राशन दुकान नंबर १४ काट्या फाईल ,
यांच्याबाबत अनेक ग्राहकांच्या तक्रारी होत्या.
जळगाव चे प्रांताधिकारी श्रीमती चौरे यांना सांगून दुकानात धाड टाकली.तेथे रेटबोर्ड,स्टॉकबोर्ड नव्हते.पाच सदस्य असलेल्या कार्डावर तीन लोकांचे धान्य देत होता.दहा लोकांच्या कार्डावर चार लोकांना धान्य देत होता. लोकांची तक्रार होती कि हा दुकानदार दाणा बाजारात राशन विकतो.त्याचा पंचनामा केला.तक्रारदाराला ताबडतोब धान्य दिले. यावरून हे सिद्ध होते की जिल्ह्यात सुरू असलेले भ्रष्टाचाराचे सत्र विविधांगी आहे, आणि हे येऊ घातलेल्या निवडणुकीत आपले रंग दाखवू शकते.