<
बौद्धिक मालमत्ता अधिकार ( intellectual property rights ) म्हणजे काय ?
जमीन-जुमला, मालकीचे घर, सोने-नाणे, बँकेतील बचत रक्कम, भली मोठी गाडी ही सारी दृश्य भौतिकसंपत्ती आहे. याशिवाय आणखीही एक वेगळी संपत्ती आहे, पण ती न दिसणारी अशी आहे. ती म्हणजे बौद्धिक संपत्ती.
बौद्धिक संपदा हक्क म्हणजे फक्त पेटंटस,नव्हे तर औद्योगिक कल्पनाचित्रे (Designs) तयार करण्यासंबंधी संकल्पना, ‘ट्रेडमार्क’,कॉपीराइट इत्यादीनचा समावेश होतो. आपण थोडक्यात सर्वांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करू.
पेटंट:-
पेटंट हे शोधकर्त्याला दिलेला त्या संशोधनावरचा अधिकार आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. पेटंट हे शोधा साठी दिले जाते पण तो शोध अथवा प्रक्रिया हि औद्यागिक उत्पादनासाठी योग्य असली तरच.
ट्रेडमार्क:-
सर्व बौद्धिक संपदा हक्कांमध्ये ‘ट्रेडमार्क’ हा सर्वात दृश्यमान व नेहमी उल्लेखिलेला हक्क आहे. ट्रेड मार्कवरून ती वस्तू एकदम चटकन ओळखता येते. त्यांचे नाव गुणवत्ता, विश्वासार्हता, टिकाऊपणा या तीन वैशिष्ट्यांशी निगडित आहे. पार्ले-जी त्यांच्या ट्रेड मार्कमुळे सर्वत्र पोहोचले आहे. तसेच बजाज, किर्लोस्कर, रिलायन्स आणि अमूल यासारखी अनेक उत्पादने, वस्तू सर्वत्र गेल्या आहेत.
कॉपी राइट:-
कॉपी राइट म्हणजे एखाद्याच्या सर्जनशील कामाचे, कृतीचे अनुकरण, अनुसरण करणे. कॉपी राइट हक्क हा सर्व निर्मितीप्रकारांना, म्हणजे साहित्यिक- बिगर साहित्यिक, नाट्यसंगीत, चित्रकला, छायाचित्रे, ध्वनी, चित्र, दूरचित्र आदी निर्मितीला लागू होतो.
जीआय :-
विशेष भौगोलिक प्रदेशात विशेष उत्पादित वस्तुंची परंपरा असते. परंपरेत ज्ञान, माहिती, कौशल्य अनेक पिढ्यांत आलेले असते उदाहरणार्थ वेंकटगिरी साडी, सिथापले साडी, कोल्हापूरी चप्पल, म्हैसूर सिल्क, दार्जिलिंग चहा या विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील वस्तू आहेत.
भारतातातील बौद्धिक संपदा अधिकार कायदा हा १८५६ पासून अमलात आणला गेला आणि त्यात कालानुरूप अनेक बदल आणि दुरुस्त्या होत आल्या आहेत.
संकलन
अरुण सुमनबाई कवरसिंग चव्हाण (एम.ए.अर्थशास्त्र )
एल.एल.बी.,पीजी.डी.आयपीआर
एस.एस.मणियार विधी महाविद्यालय,जळगाव
[email protected]