<
मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेअंतर्गत घेतल्या गेलेल्या इंटर मिजिएट चित्रकला परीक्षेत येथील जे ई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले, विद्यालयाची विद्यार्थिनी कु सानिका विलास बऱ्हाटे ही “ए” ग्रेड मिळवून सहा राज्यातून ७०वी आली. सहा राज्यातून एकूण पावणे तीन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. जे ई स्कूल मधून इलेमेंटरी परीक्षेसाठी ११८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९२.३७ टक्के लागला. या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थी “ए” ग्रेड मध्ये १८ तर ”ब” ग्रेड मध्ये ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर तर इंटर मिजिएट चित्रकला परीक्षेसाठी विद्यालयातुन ८९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी ८६ उत्तीर्ण झाल्याने ९६.६२ टक्के निकाल लागला. १३ विद्यार्थी ”अ” ग्रेड मध्ये तर ३९ विद्यार्थी “ब” ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेत. कु सानिका हीने “अ” ग्रेड मिळवत सहा राज्यातून ७०वा क्रमांक मिळवला. कु सानिका शाळेतील विज्ञान शिक्षक व्ही.डी. बऱ्हाटे यांची सुकन्या आहे. सर्व विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक एम आर सुरवाडे, एच बी बाऊस्कर व सौ ए डी भोळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या चेअरमन सौ रोहिणीताई खडसे – खेवलकर, सचिव डॉ सी एस चौधरी सर्व संचालक मंडळ, प्राचार्य आर पी पाटील, उप प्राचार्य एस एन चौधरी, पर्यवेक्षक व्ही एम लोंढे, आर महाजन, आर बी फिरके व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.