<
पाळधी/धरणगांव(प्रतिनीधी)- सूर्या फाऊंडेशन संचलित, नोबल इंटरनॅशनल स्कुल पाळधी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंती निमीत्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्कुलच्या अध्यक्षा सौ. अर्चना सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर यांनी नेताजींच्या स्वातंत्र्यातील योगदानाविषयीची माहिती दिली. यात नेताजींनी कश्या प्रकारे परदेशातुन आझाद हिंद सेना स्थापन करुन “तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादि दुंगा” या सिंह गर्जनेसह महिलांची झाशीची राणी लक्ष्मीबाई हे स्थापन करून महिलांचाही स्वातंत्र्यासाथी एक सशस्र लढा दिला याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या वेळी उज्वल झवर, गुणवंत पवार, विजया मोर, अश्विनी ठाकरे, राधिका उपाध्याय, सुवर्णा पवार यांच्या सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या उपस्थित होते.