<
पाचोरा(प्रमोद सोनवणे)- तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल यांची बदली करण्यात यावी व यांची चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा या करिता सातगाव डोंगरी येथील अशोक मानखाँ तडवी, बेबाबाई आलोद्दीन तडवी व ग्रामस्थ हे पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वरजी कातकडे साहेब यांच्या कार्यालयासमोर दिनांक २५ जानेवारी २०२० शनिवारी दुपारी साडेबारा वाजेपासुन आमरण उपोषणाला बसणार असल्याचे उपोषण कर्त्यांनी जाहीर केले असून न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरुच राहील असे मत व्यक्त केले. कारण सातगाव डोंगरी गावात वर्षानुवर्षापासुन मोहरम सण हिंदू, मुस्लिम, तडवी व सर्वधर्मबांधव एकत्रित सर्वधर्मसमभाव राखून साजरा करतात याच मोहरम सणानिमित्त सवाऱ्या काढण्यात येतात म्हणून धार्मिक उत्सव साजरा करण्यासाठी अशोक तडवी व काही ग्रामस्थ हे सालाबादप्रमाणे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दिनांक २ नोव्हेंबर २०१९ रोजी सवाऱ्या काढण्यासाठी रितसर ऑनलाइन परवानगी घेऊन परवानगी घेण्यासाठी गेले असता पोलीस स्टेशनमध्ये हजर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्रजी बागुल यांनी या वर्षी आम्ही परवानगी देणार नाही हा सन मुसलमान समाजाचा असुन तुम्ही भिल्ल असून तुम्ही हिंदू मध्ये मोडले जातात तुम्हाला या सणाशी काय घेणेदेणे तुम्ही पुर्णपणे हिंदू धर्म स्विकारुन घ्या तसेच तुमच्या गावात आतापर्यंत चालत आलेल्या या सणाला आता व या पुढेही परवानगी मिळणार नाही व तुम्ही हिंदू , मुस्लिम , तडवी मिळुन जरी हा सण साजरा करत असले तरीही तुम्ही सवाऱ्या काढल्याच तर तुम्हा सर्व लोकांवर गुन्हा दाखल करु व तुम्हाला या वर्षी परवानगी मिळणारच नाही तुम्हाला जे करायचे ते करा असे सांगत अपमानास्पद वागणूक देऊन हाकलून लावत समोरचे भिल्ल आहेत हे असे ऐकनार नाहीत त्यांच्यावर आताच खोटे गुन्हे दाखल करून आतमध्ये टाका म्हणजे कोणीही मोहरमची परवानगी घ्यायला येणार नाही व आपल्या मागची कायमस्वरूपी कटकट बंद होईल हे सुरू असतांनाच आम्ही साहेबांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तुम्ही आम्हाला लेक्चर देऊ नका आम्हाला नोकरीची गरज नाही येथून लवकर निघून जा सांगितले या वेळी मी व माझ्या सोबत असलेले नबाब फकीर व मोयद्दीन तडवी घाबरून घरी गेलो दुसऱ्या दिवशी पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वरजी कातकडे साहेब यांना घडलेला प्रकार सांगीतला व या साहेबांनी क्षणार्धात आम्हाला परवानगी मिळवून दिली ईश्वर नाव असलेले अधीकारी खरच ईश्वर म्हणजे देवासारखे भेटल्याने आम्ही हा सण साजरा करु शकलो परंतु या सणानिमित्त परवानगी घेण्यासाठी गेलो असता आमच्याशी मनमानी पणे वागणूक देऊन आम्हाला हाकलून लावत आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली म्हणून आम्हाला नहाकच मानसिक ताण सहन करावा लागला म्हणून या मुजोर अधिकारी बागुल यांची त्वरित बदली व्हावी म्हणून आम्ही दिनांक २५ जानेवारी २०२० पासून पाचोरा उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे जाहिर केले असल्याचे ते बोलत होते. या बाबतीत सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी रवींद्र बागुल यांच्याशी भ्रमणध्वनीवर दोन दिवस सतत संपर्क साधून सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी सुरवातीला फोन घेतले नाहीत व नंतर मोबाईल नंबर ड्रायव्हट केल्याने संपर्क होत नाही म्हणून दिनांक २२ बुधवार रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला जाऊन खुलासा घेण्यासाठी गेलो असता बागुल यांनी मला अर्जंट कामानिमित्त जाण्याची गरज असल्याचे सांगितले म्हणून खुलासा घेता आला नाही.