<
जळगाव परिमंडळ- महावितरणच्या जळगाव परिमंडळात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिवसानिमित्त मुख्य अभियंता मा.श्री. दिपक कुमठेकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणापुर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
यशस्वी खेळाडूंचा प्रशस्तीपत्राने गौरव
महावितरणच्या नागपूरात झालेल्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडळीय स्पर्धेत जळगाव –औरंगाबाद परिमंडळाच्या संयुक्त संघ सहभागी झाला.या स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंचा मुख्य अभियंता यांचे हस्ते गौरव करण्यात आला. वैयक्तिक क्रीडा प्रकारात पुरूष गटातून दोंडाईचा विभागातील यंत्रचालक चेतन केदार (लांब उडी व उंच उडी –प्रथम), चाळीसगाव विभागातील यंत्रचालक धर्मेंद्र पाटील (थाळी फेक –प्रथम) या दोन कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. खो-खो या सांघिक क्रीडा प्रकारात उपविजेता ठरलेल्या महिला संघातील खेळाडू कर्मचारी श्रीमती रत्ना पाटील, कु.यास्मीन तडवी, कु.पुनम थोरवे , श्रीमती रागिणी बेले, श्रीमती जमिला शाह, कु.मोनी बारेला, श्रीमती गोदावरी भांगरे, श्रीमती योगिता बोरसे, कु. रिना बिस्वास, श्रीमती मिनु तांदळे यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कर्मचारी पाल्यांना शिष्यवृत्ती धनादेश
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी कल्याण निधीतून कर्मचारी व अवलंबिताकरीता विविध योजना राबविता येतात. त्यात इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण कर्मचारी पाल्यांना वार्षिक रोख परितोषिक व शिष्यवृत्ती मंजुर केली जाते. निवडक कर्मचारी पाल्यांना त्यात इयत्ता 10 वी उत्तीर्ण दुशाली पाटील, स्वरांगी श्रावगी, साहिल शेख, संदेश पाचंगे, विदीशा सोनवणे यांना प्रत्येकी रू.6500/- तर 12 वी उत्तीर्ण विशाल पाटील यांना रू. 9600/- चे रोख परितोषिक व शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी जळगाव मंडळाचे सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री.नेमिलाल राठोड, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अमोल बोरसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्य लिपिक मधुसूदन सामुद्रे, धनराज करोसिया यांनी प्ररिश्रम घेतले.