Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्यासाठी २६ रोजी देशभक्तीपर कार्यक्रमांचा महोत्सव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्यासाठी २६ रोजी देशभक्तीपर कार्यक्रमांचा महोत्सव
पत्रकार परिषदेत माहिती देतांना उडानच्या संचालिक हर्षाली चौधरी व आदी सहकारी

उडाण फाउंडेशन जोपासतेय सामाजिक बांधिलकी;फाउंडेशन चे उल्लेखनीय कार्य

जळगाव-(प्रतिनिधी)- शहरातील रूशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचलीत उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील गतीमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी उद्या दि.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत निधी संकलनासाठी सांस्कृतिक देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उडानच्या संचालिक हर्षाली चौधरी यांनी दिली.
गेल्या तीन वर्षापासून दिव्यांग व गतीमंद मुलामुलींसाठी उडान फाऊंडेशन कार्यरत आहे. गेल्या काही वर्षापासून दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांची संख्या वाढतच असून संस्थेसाठी देणगीचे प्रमाण नगण्य आहे. दिव्यांग विद्यार्थी तयार करीत असलेल्या वस्तूंच्या विक्रीतून येणार्‍या नफ्यावरच संस्थेचे कार्य अवलंबून असते. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी निधी संकलीत करण्याचे नियोजन उडान फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे.

500 वर स्पर्धकांचा सहभाग

उद्या दि.26 रोजी दुपारी 4 वाजता खान्देश सेंट्रल मॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी शहरातील 60 शाळा, महाविद्यालयातील 500 पेक्षा अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. त्यात 30 जिल्हा परिषद आणि मनपा शाळांचा देखील समावेश आहे. कार्यक्रमासाठी खान्देश सेंट्रल मॉल, एबीएस जीम, इम्पॅक्ट फोटो, चिरमाडे साऊंडचे सहकार्य लाभणार आहे.

निधी संकलनासाठी आवाहन

उडानतर्फे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी देशभक्तीपर गीत, सामुहिक गीत, समुह नृत्य, रॉक बॅन्ड सादर करणार आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या दानशूर व्यक्तींना दिव्यांगांच्या पंखाना बळ देण्यासाठी सहाय्य करायचे असेल ते त्याठिकाणी 1 रूपयापासून आर्थिक मदत देवू शकतात. तरी जळगावातील अधिका-अधिक नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी, असे आवाहन उडानच्या संचालिक हर्षाली चौधरी यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला हितेश पाटील, दिप्तेश चौधरी वसीम खान, चेतन वाणी आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

निकोप लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराने राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदान करावे- जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

Next Post

महावितरणात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा

Next Post

महावितरणात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo