<
जळगाव(प्रतिनिधी)- येथे सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. उत्सव साजरा करण्यापूर्वी संस्थेच्या सचिव ज्योती पाटील यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत नंतर संविधान उद्देशिका सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषण, देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी महामानव व स्वतंत्र सेनानी नेत्यांची वेशभूषा सादर केली. ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय रंगभरन स्पर्धेत स्वच्छते बाबत छायाचित्रे रंग भरून स्वच्छता अभियानाचा संदेश दिला. या स्पर्धेत ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले त्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देवून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाला ग.स. चे अध्यक्ष मनोज पाटील, ज्योती पाटील, बी.आर. पाटील, संतोष पाटील, लीना पवार, पूजा कुलकर्णी, प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचे कार्यक्रम बसविण्यात सुवर्णलता अडकमोल व विद्या पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने, दिपाली देवरे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.