<
जळगाव-(प्रतिनिधी)-आपण जत्रा तर खूप बघतो परंतु एखाद्या जत्रेत शाळकरी मुले सहभागी होऊन मनोरंजनासोबत अभ्यासाची माहिती देताय अशी आगळी वेगळी जत्रा केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि.30 जानेवारी गुरुवार रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर जत्रेत इयत्ता 4 थी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत मराठी, गणित ,इंग्रजी ,कला ,कार्यानुभव ,शारीरिक शिक्षण अशा विषयांचे वेगवेगळे दालन असून त्यात विद्यार्थी आपले तक्ते , मॉडेल्स , चित्र , वस्तू , शैक्षणिक साहित्य , आदींचा वापर करून त्या त्या घटकाची माहिती सांगणार आहे.जत्रा ही अभ्यासाची असून विद्यार्थ्यांना मनमोकळे बोलण्याची , फिरण्याची , प्रश्न विचारण्याची संधी या जत्रेतून मिळणार आहे.
जळगाव शहारच्या सर्व प्राथमिक शाळांना सकाळी 11 ते 2 या वेळत जत्रा बघायला मिळणार असून शहरातील सर्व शाळांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन शाळेच्या मुख्या. रेखा पाटील यांनी केलेले आहे.