<
जळगाव : येथील तांबापुरा परिसरातील गवळीवाडा येथे आदर्श माहेश्वरी महिला मंडळ व बॉक्स ऑफ हेल्प संघटनेच्या वतीने गरजू व गरीब रहिवाशांना जेवण देण्यात आले. प्रजासत्ताक दिनी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा तोतला व बॉक्स ऑफ हेल्पच्या अध्यक्ष सुधा काबरा यांच्या हस्ते नागरिकांना जेवण देण्यास प्रारंभ करण्यात आला. एकूण ४० नागरिकांना याचा लाभ झाला. यावेळी नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक करीत आभार मानले. यावेळी माहेश्वरी महिला मंडळाच्या संस्थापिका शीतल मंत्री, सचिव अमिता सोमाणी, श्रीकांता मणियार, सुषमा मणियार, लतिका मंत्री, रंजना काबरा, रेखा तोतला, रेखा जाजू, सुषमा मनियार, गीता जाखेटे, भारती कोगटा, ज्योति लढ्ढा, सुवर्णा मुंदड़ा, मनीषा मनियार,लीना काबरा, सोहिनी तोष्णीवाल, संगीता कलंत्री, सारिका कोगटा, आरती काबरा, सोनाली काबरा, सुवर्णा मुंदडा, संध्या मुंदडा यांचेसह बॉक्स ऑफ हेल्प संघटनेच्या सुलभ लढढा, नीता परमार, आदर्श मंडळाचे कार्यकारिणी सदस्य व माजी अध्यक्ष उपस्थित होते.