<
सागर पार्कवरील उद्योग उत्सवात भरला नवउद्योजकांचा मेळावा
जळगाव : नवउद्योजकांना बळ मिळावे याकरिता त्यांना प्रोत्साहन म्हणून नवउद्योजकांचे मेळावे भरविणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले.
श्री जैन युवा फौंडेशनतर्फे रविवार दि. २६ जानेवारी रोजी सागर पार्क येथे एकदिवसीय “उद्योग उत्सव २०२०” हा मेळावा घेण्यात आला. त्याचे उद्घाटन फीत कापून मान्यवरांनी केले. अॅड. उज्ज्वल निकम हे अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रसंगी मंचावर जैन उद्योग समूह अध्यक्ष अशोक जैन, संघपती दलीचंद जैन, माजी आ.मनिष जैन, गोसेवक अजय ललवाणी, हेमंत आगीवाल, योगेश चौधरी, अशोक बेदमुथा, येज्दी पाज्नीगारा, शिवाजी हिवाळे, फौंडेशनचे अध्यक्ष दर्शन टाटीया, सचिव रितेश छोरीया उपस्थित होते.
सुरुवातीला गणेश पूजन व दीपप्रज्वलन मेळाव्यात करण्यात आले. यावेळी प्रस्तावनेत अध्यक्ष दर्शन टाटीया यांनी मेळावा घेण्यामागील उद्देश सांगितला. यावेळी द्लीचंद जैन यांनी मनोगत व्यक्त करीत उद्योग उत्सवासारख्या मेळावे रोजगारप्राप्तीसाठी महत्वाचे असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषण अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार प्रवीण पगारिया यांनी मानले.
उदघाटनानंतर मान्यवरांनी मेळाव्याची पाहणी केली. मेळाव्यात लघु, युवा, महिला व नवउद्योजकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. ज्वेलरी, फॅशन, इलेक्ट्रोनिक्स वस्तू, घरी बनविलेल्या वस्तू व खाद्यपदार्थ, पादत्राणे विक्रीसह मनोरंजनासाठी आनंद मेळा यावेळी आयोजीत करण्यात आला होता.
सकाळी “सेव्ह द वर्ल्ड” या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात ८ ते १० व ११ ते १२ या वयोगटातील दोन गटात विद्यार्थ्यांनी पृथ्वी वाचवाविषयी संदेश देणारे चित्र काढले. सुमारे १२० मुलांनी यात सहभाग नोंदवला. तसेच संध्याकाळी ४ ते ७ आणि ८ ते १२ या वयोगटात फॅन्सी ड्रेस स्पर्धाही घेण्यात आली. प्रजासत्ताक दिनानीमिताने स्वातंत्र्यसेनानी हि थीम घेत विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा केल्या होत्या. दुपारी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. ५५ व्यक्तींनी यात सहभाग नोंदवला. यात घरी बनविलेले, तसेच देश विदेशातील विविध खाद्यपदार्थाची चव जळगावकरांना मिळाली.
उद्योग उत्सवासाठी कोषाध्यक्ष पियुष संघवी, प्रविण पगारिया, सचिन राका, प्रवीण छाजेड, प्रणव मेहता, दीपा राका, स्वाति पगारिया, राहुल बांठिया, आनंद चांदीवाल, सौरभ कोठारी, मनोज लोढ़ा, जितेंद्र लोढ़ा, अनिश चांदीवाल, चंद्रेशखर राका, विनय गांधी, संदीप सुराणा, सुशील छाजेड़, पारस कुचेरिया, मनीष लूनिया, शैलेश कटारिया, यतिन राका, आशीष कांकरिया, गौरव पंगरिया, धीरज पारख, धीरज बैदमुथा, अनिल सिसोदिया, पीयूष दीपक संघवी, रीतेश पगारिया, तेजस जैन, नीरज छाजेड़, प्रीतेश चोरड़िया, स्वाती पगारिया, दीपा राका, प्रणव मेहता, यांच्यासह प्रोजेक्ट चेयरमैन राहुल बांठिया, आनंद चांदीवाल, अल्पेश कोठारी, खुशबू टाटिया, सपना छोरिया, टीना संघवी यांच्यासह मंडळाचे सदस्यांनी परिश्रम घेतले.
विविध स्पर्धांचे निकाल –
फूड स्टॉल : सर्वोत्कृष्ट सादरीकरण – शिवानी कावडीया, आशा मुथा, सचिन छाजेड, वैशाली रेदासनी, विद्या अय्यर प्रीती बोरा, उत्कृष्ट डेकोरेशन – रचना शाह, फॅन्सी ड्रेस स्पर्धा – ८ ते १२ वयोगटातील – माही झांबड, विश्व श्रीश्रीमाळ, आर्ना पगारिया, जान्हवी राठोड, ४ ते ७ वयोगटातील – युग पंगारीया, दिव्यम झांबड, विरांश सुराणा, डिम्पल राका यांना विजेतेपद मिळाले.
चित्रकला स्पर्धा –
वयोगट ८ ते १० – हर्षल पाटील, साक्षी जैन, संजीवनी कळसकर, पारस पाटील, वयोगट ११ ते १२ – जान्हवी राठोड, यथार्थ झंवर, शुभम चौधरी, तनिष जैन.