<
मू. जे महाविद्यालाच्या ‘चैतन्य २०२०’ स्नेहसंमेलनाचा उत्साहत समारोप; अहिराणी गाण्यांवर थिरकली तरुणाई
जळगाव दि.२८ – तुमच्या भविष्याला आकार देण्याचे व्यासपीठ महाविद्यालय आहे, याठिकाणी असलेल्या सुविधांचा तुमच्या ज्ञानासाठी उपयोग कसा करावा हे तुम्ही ठरवावे, एखाद्याला पूजापाठ जरी चांगला येत असेल तर त्यात सुद्धा रोजगार आहे. उठा आणि सुरुवात करा. आपल्या मर्यादा ओळखा अशक्य ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा, जरी ते कठीण असले तरी अशक्य नाही. थांबू नका, वेळ वाया न घालवता त्याला सकारात्मकतेने सामोरे जा, असे विचार वासुदेव महाजन यांनी मु.जे महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या समारोपाप्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर के.सी.ई.च्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य हरीशभाई मिलवाणी, प्रा. चारुदत्त गोखले, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, वाणिज्य विद्याशाखेचे वाय. ए सैंदाणे, विज्ञान विद्याशाखेच्या प्रमुख प्रा. डॉ. गौरी राणे, ऑटोनॉमस इन्चार्ज डॉ. स.ना. भारंबे,प्रा. सुरेखा पालवे, प्रा.ए. पी. सरोदे ,कला शाखेचे भूपेंद्र केसुर, प्रा. जे.एन. चौधरी उपस्थित होते. महाविद्यालयात आल्यावर आपण पारंपरिक शिक्षण घेतो. वार्षिक स्नेहसंमेलन हे व्यक्तिमत्व विकासाचे व्यासपीठ आहे. शैक्षणिक स्वायत्तता ही तुमच्या विषय निवडीचे स्वतंत्र निश्चित करते, या स्नेहसंमेलन व आठवणी तुम्हाला संकटाच्या व अडचणीच्या काळात प्रेरणा देतात यासाठी दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुख्य पाहुण्याचे मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात येते असे प्रा. उदय कुलकर्णी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. प्रा. सुरेखा पालवे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. त्यानंतर सेवा निवृत्त प्राध्यापक,कर्मचारी व विशेष कौशल्य प्राप्त शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.स्नेहसंमेलनाच्या समारोपाचे आभार डॉ. स.ना. भारंबे यांनी तर सुत्रसंचालन प्रा. योगेश महाले यांनी मानले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
फुगे घ्या फुगे ..केसांवर फुगे,म्हनी मामानी पोर…,यासारखी सदाबहार अहिराणी गीतांवर तरुणाईने ठेका धरला तर देशभक्ती गीतांवर भारत माता की जय चा जल्लोष केला.मू.जे.महाविद्यालयाच्या ‘वार्षिक स्नेहसंमेलनात सकाळी ९ वाजता अंताक्षरी स्पर्धेने सुरवात झाली .या अंताक्षरी स्पर्धेत एकूण पंधरा विद्यार्थ्यांनी विविध राज्यांच्या पारंपारिक वेशभूषेत सहभाग नोंदवला .या स्पर्धेत “गुजरात के रंगिले” ,”साऊथ के थलाइवा” ,”पंजाब के दिलदार” ,”महाराष्ट्र केधुरंदर”,”राजस्थान के नवाब” हे पाच संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक – राजस्थान के नवाब(दीपक पाटील ,प्रांजळ भावसार ,सचिन गोपाल ) द्वितीय क्रमांक – साऊथ के थलाइवा(रुपेश पोकळे,श्रद्धा जोशी ,भूषण गावंदे ) गुजरात के रंगिले(प्रसन्ना पाटील,गुल्नाज सय्यद,मोहम्मद तन्वीर रजा,) या स्पर्धे साठी प्रा..जे.व्ही.पाडवी व प्रा.डॉ.जयश्री महाजन परीक्षक म्हणून लाभले.या अंताक्षरी स्पर्धेनंतर विविध वेशभूषा स्पर्धा पार पडली .या स्पर्धेत एकूण सोळा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .यात विद्यार्थ्यांनी बंगाली,महाराष्ट्रीयन ,बहिणाबाई ,आदिवासी,शेतकरी ,पेशवा,जिजाऊ,सोशल मिडिया,ट्राफिक सिग्नल अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी वेशभूषा सादर केली.या स्पर्धेसाठी प्रा.के.के.वळवी व प्रा. स्वप्नाली वाघुळदे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली .या स्पर्धेचे विजेते –प्रथम क्रमांक – वैष्णवी विनोद तांबट ,द्वितीय क्रमांक – सोनाली अनिल महाजन आणि तृतीय क्रमांक – प्रियांका सुधाकर दांडगे