<
जळगाव – के सी ई अमृत महोत्सवी वर्षांत आय. एम. आर. मध्ये आंतरमहाविद्यालयीन बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. २५ ला करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन रोटरँक्ट क्लब- आय.एम.आर. आणि रोटरँक्ट क्लब (जळगाव वेस्ट) यांच्या संयुक्त विद्यमानाने झाले. या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्पुर्त प्रतिसाद लाभला. एकूण १८ संघ सहभागी झाले होते. तसेच एकूण २१ सामने खेळवण्यात आले. प्रत्येक सामन्यासाठी ५ षटके ठेवण्यात आली होते. विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या स्पर्धेत मु.जे. महाविद्यालय, के.सी.ई. इंजिनीअरिंग कॉलेज, मणियार लाँ कॉलेज, बाहेती कॉलेज, व रायसोनी कॉलेजच्या संघांनी सहभाग घेतला. सुप्रीम इंडस्ट्रीज व आयफोनवाला यांनी प्रायोजकत्व स्वीकारले.
विजेता संघ – एम.जे. कॉलेज रोख पारितोषिक रु. ७००० व करंडक ,उपविजेता संघ आय. एम. आर. रोख पारितोषिक रु. ७००० व करंडक,एकूण २१ मँन ऑफ द मँच खेळाळू निवडण्यात आले. बेस्ट बॉलर – स्वप्नील जाधव (के.सी.ई.आय. एम.आर) ठरला. बेस्ट बँटमन – गौरव जैन (एम.जे. कॉलेज) याला मिळाले. व मँन ऑफ द सिरीज – गौरव वनरा (के सी ई आय. एम. आर) हा ठरला. बक्षीस वितरण संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्य आणि जेष्ठ उद्योजक हरीश मिलवाणी यांच्या हस्ते आणि सुरेश मंत्री, विपुल पारेख (सुप्रीम इंडस्ट्रीज) यांच्या प्रमुख उपस्थितीत व आयएमआरचे माजी विद्यार्थी आणि प्रसिध्द उद्योजक अमित आहुजा, रोहित आहुजा (आयफोनवाला) यांच्या हस्ते झाला. पंच विशाल विश्वकर्मा, रुपेश राठोड, व अमोल राठोड यांनी जबाबदारी पाहिली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धेचे समन्वयक डॉ. ममता दहाड, प्रा निलीमा पाटील, प्रा. अमोल पांडे व विद्यार्थी आयुष गौड, सलोनी पाटील, स्वप्निल खडसे आणि आय एम आर चे माजी विद्यार्थी आणि रोटरँक्ट क्लबचे अमृत मित्तल व धीरज फटांगळे यांनी कामे पाहिली. नाविन्यपूर्ण स्पर्धेच्या आयोजनासाठी परीसंस्थेच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी प्रेरणा दिली. परीसंस्थेतील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला.