<
मुंबई -(प्रतिनीधी) – आझाद मैदान येथे राज्यातील एकूण ११ शिक्षक संघटनेद्वारे एकत्रितपणे स्थापित करण्यात आलेल्या शिक्षण समन्वय संघाच्यावतीने जवळजवळ २० वर्षांपासून विनावेतन सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयातील अनुदानास पात्र ठरवून अनुदान मंजूर झालेल्या उच्च माध्यमिक शाळा/क.म.वि.व वर्गतुकड्या तसेच तसेच २०% अनुदान प्राप्त शाळा/महाविद्यालयांना प्रचलित नियमानुसार वाढीव अनुदानाची तात्काळ आर्थिक तरतुद करुन ते १९ सप्टेंबर २०१६ चा शासन निर्णय रद्दं ठरवून १५ नोव्हेंबर २०११ व २६ फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे पगार सुरु करण्यात यावा ह्या प्रमुख मागणीसह इतर अनेक प्रलंबीत मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे २७ जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर आंदोलक शिक्षकांनी १० वी तसेच १२ वीच्या मंडळातर्फे आयोजित परिक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांसाठी घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करुन तात्काळ पगार सुरु करुन २० वर्षांपासून विनावेतन ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा वनवास संपवावा नाही तर ह्याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. आंदोलनास निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत पाटील, प्रवीण पाटील, प्रवीण बोरसे,नंदू पाटील, पी. जे. पाटील, शशिकांत पाटील,घनशाम महाले, जगन्नाथ पाटील, महेंद्र पाटील,संदीप बाविस्कर, तुषार मोरे, रमेश धनगर, कैलास पाटील, श्रीकांत बोरसे, धैर्यशील चव्हाण, प्रयाग पाटील, प्रेमचंद चौधरी आदि कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव येथील शिक्षक २७ तारखेपासून ठाण मांडून बसले आहेत.