<
कानळदा /जळगाव-(प्रतिनिधी) – ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय कानळदा येथे सत्य,अहिंसा,स्वदेशी व बहिष्कार या मार्गाचा अवलंब करून स्वातंत्र्य प्राप्त करून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी “हुतात्मा दिन”म्हणून साजरी करण्यात आली.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.के.पी.चव्हाण सर,उपमुख्या.श्री.के.एम.विसावे सर यांच्या उपस्थितीत विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.एन.एच.बाविस्कर सर यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.हुतात्मा दिनाचे औचित्य साधून 9 वीच्या विद्यार्थिनी अस्विता सोनवणे,तनुजा कोळी,गीतांजली पाटील यांनी महात्मा गांधीजींच्या कार्याचा परिचय आपल्या भाषणातून करून दिला.तसेच विद्यालयाचे उपशिक्षक श्री.एम.जे.पाटील यांनी आपल्या मनोगतात ‘आजच्या काळात महात्मा गांधीजींच्या विचारांची गरज’यावर आपले विचार व्यक्त केलेत.या कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीम.व्ही.जे.पवार यांनी सादर केली.आभारप्रदर्शन श्री.आर.व्ही.पाटील यांनी मानले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.