<
जळगाव- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या संस्थांना “ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार ” या नावाने पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्कारांतर्गत अनु.जातीच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, निवासीशाळा/ आश्रमशाळा अनुदानित वसतिगृहे यांना देण्यात येणार आहे. सदर पुरस्कार राज्यस्तर तीन व विभागस्तरावर तीन अशाप्रकारे 06 प्रकारचे पुरस्कार देण्यात येणार असून राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये प्रथम पुरस्कार रु.5 लाख ( रुपये पाच लाख ) , व्दितीय पुरस्कार रु.3 लाख (रुपये तीन लाख ) तृतीय पुरस्कार रु.2 लाख ( रुपये दोन लाख ) अशा प्रकारे असून विभागीयस्तर अनु.जातीच्या मुला-मुलींसाठी शासकी वसतिगृहे, निवासी शाळा/आश्रमशाळा अनुदानित वसतिगृहे अशा प्रकारे दिले जाणार आहेत. महसुली विभागातून गुणवत्तेच्या आधारे अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे एकूण 06, अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी निवासी शाळा / आश्रमशाळा 06, तर अनुसूचित जाती मुला-मुलींची अनुदानित वसतिगृहे 06 अशाप्रकारे राज्यस्तरीय 03 आणि विभागस्तरीय 18 अशा एकूण 21 पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण , जळगाव योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.