<
जळगाव-जिल्ह्यातील खत कंपनीचे जिल्हा प्रतिनीधी आणि जिल्हा फर्टीलायझर, पेस्टीसाईड व सिड्स डिलर्स असोसीएशनचे अध्यक्ष तसेच कार्यकारीच्या सदस्यांसमवेत नुकतीच बैठक संपन्न झाली. खत उत्पादक कंपनी युरीया खतासोबत पाण्यात विद्राव्य खत विक्रेत्यांना सक्ती करीत असल्याने शेतकऱ्यांना युरीया खताचा तुटवडा किंवा जादा दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बैठकीत कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी सर्व खत कंपन्यांचे प्रतिनींना युरीया खतासोबत लिंकीग करून खत न देण्याबाबत सक्त सूचना देवून जिल्ह्यात कोठेही युरीया खतासोबत लिंकीग आढळून आल्यास संबंधित खत कंपनी विरूध्द खत नियंत्रक आदेश 1985 अन्वये कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांना किंवा कोणत्याही नागरिकांस असे प्रकार निदर्शनास आल्यास त्यांनी संबंधित कृषी अधिकारी, पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात तक्रार दाखल करावी, असे आवाहन कृषी उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.