<
जळगाव : जाऊया फुलांच्या जगात…पिवळे, लाल, निळे, पांढरे…रंगीबेरंगी…असे म्हणत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी फुलांचे महत्व, त्याचे फायदे जाणून घेत विविध फुलांच्या प्रकाराचे प्रात्यक्षिक करून पाहिले.
प्रसंग होता मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयातील. विद्यार्थ्यांसाठी फुलांचा प्रकल्प शुक्रवारी ३१ रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध रंगांची, विविध प्रकारची फुले विद्यार्थ्यांसाठी आणत त्यांना त्याची माहिती संस्थेचे सचिव व उपशिक्षक मुकेश नाईक यांनी करून दिली. फुलांचा उपयोग कुठे, कसा होतो याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. शिक्षिका किरण पाटील यांनी विविध फुलांबद्दल माहिती सांगितली. प्रसंगी वातावरणात शिक्षिका रोहिणी शिंदे यांनी फुलांविषयी विविध गाणी सादर करीत कार्यक्रमात जल्लोष निर्माण केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी फुलांचे विविध प्रकार करून दाखविले. यात गजरा, तोरण, हार, वेणी यासह फुलांच्या सुरेख रांगोळ्या देखील विद्यालय परिसरात काढून दाखविल्या. या कलाकृती काढण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मुख्याध्यापिका शीतल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. विद्यालयातील शिक्षक किरण पाटील, रोहिणी शिंदे, आम्रपाली शिरसाठ, छाया केदार, हर्षा काळे, उज्ज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, जया पाटील, माधुरी सपकाळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आमच्या राज प्राथमिक /माध्यमिक विद्यालय व डॉ. सुनिलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेज मेहरुण जळगाव येथे महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन निमित्त विनम्र अभिवादन