<
जळगाव – येथील पाणंद फाऊंडेशनच्या उपक्रमांचा धडाका सुरूच. मन्यारखेडा शिवारात स्वखर्चाने केले वृक्षारोपण. व्हाट्सअप ग्रुप च्या दुनियेत आदर्श ग्रुप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेज फ्रेंड्स ग्रुप ने पाणंद फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि त्यानंतर अनेक असे सामाजिक उपक्रम घ्यायला सुरुवात केली .त्याचाच एक भाग म्हणजे नुकतेच दिनांक 21/07/ 2019 रोजी रविवार सुट्टीचा दिवस सत्कारणी लावत या मित्रांनी मन्यारखेडा शिवारात गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज च्या मागे सुधाकर नगर मधील खुल्या जागेत अतिशय उत्साहाने वृक्षारोपण केले व निव्वळ वृक्षारोपण न करता या तरुणांनी स्वखर्चातून संरक्षक जाळ्याही प्रत्येक झाडाला बसवून दिल्या या कामात परिसरातील रहिवाशीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते .जे झाड लावतात ते जगवतातच “अशी पाणंद फाउंडेशनची ओळख आहे” निव्वळ फोटोसेशनसाठी कार्य न करता लावलेल्या झाडांची वर्षभर काळजी पाणंद फाउंडेशन चे सदस्य घेत असतात व लावलेली झाडे 100% जगवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्थरातून कौतुक होत आहे. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमात संस्थेचे मार्गदर्शक दिलीप बारी ,अध्यक्ष अमित तडवी, सचिव पंकज नहाले ,उपाध्यक्ष हर्षल पाटील, खजिनदार शशिकांत फेगडे, सदस्य अमित पाटील, ज्ञानेश्वर साळुंके ,गजानन शिंदे ,पंकज महाजन, निलेश आहिरे ,धीरज महिरे ,गिरीश भोसले ,संजय राजपूत ,हरीष अस्वार ,पद्माकर खैरनार, लोखंडे साईनाथ, चंद्रकांत चौधरी ,ईश्वर पाटील, किरण पाटील व परिसरातील नागरिकांनी मेहनत घेतली.