<
जळगाव-मुळजी जेठा महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग व शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेला म्हणजे ‘मूकनायक’ या पाक्षिकाच्या प्रकाशनाला आज रोजी शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा.संदीप केदार यांनी मूकनायक मधील अग्रलेखाचे वाचन केले. तसेच आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी म्हटले की “समाजाने दूर सारून मुके करून टाकलेल्या सामान्यजनांच्या जीवन जाणिवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकातुन प्रकाश झोतात आणले. जो समाज आपल्याच रूढी परंपरांचा बळी पडला होता, त्या समाजाला या महामानवाने जगण्याची नवी आशा मिळवून दिली आणि समाजाला जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. आजपासून 100 वर्षांपूर्वी दिनांक 31 जानेवारी 1920 रोजी सुरू झालेले हे पाक्षिक त्या काळात उचललेले एक मोठे धाडसी पाऊल होते.” असे ते म्हणाले.
सदर कार्यक्रमाला जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग विभागाचे विभागप्रमुख प्रा. संदीप केदार, प्रा केतकी सोनार, प्रा. प्रशांत सोनवणे, प्रा. अभय सोनवणे, प्रा. संजय जुमनाके तसेच शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र विभागाचे डॉ एस डी भंगाळे , प्रा केतन चौधरी, प्रा. रामलाल शिंगणे, प्रा निलेश जोशी, प्रा प्रवीण कोल्हे, डॉ स्वाती चव्हाण, डॉ सुनीता ढाके, राजेंद्र नारखेडे, मोहन चौधरी, डॉ रंजन सोनवणे, प्रा पंकज पाटील, निलेश नाईक, डॉ वंदना चौधरी, प्रा अंजली बन्नापुरे, डॉ जयश्री पाटील, डी. टी. एड. चे विभागप्रमुख दुष्यंत भाटीवाल आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.