<
जळगाव – के. सी. ई. सोसायटीच्या पी. जी. कॉलेज ऑफ सायन्स येथे पी. जी. टेक्नॉलॉजीया-२०२० या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या कॉलेजमधून व विद्यापीठाच्या विभागांमधून ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग दिला. रसायनशास्त्र, लाईफ सायन्स व मॅथेमॅटीकल सायन्स या तीन विषयांमधून सहभागी विद्यार्थ्यांनी पॉवर प्रेझेंटेशन द्वारे सादरीकरण केले. यात रसायनशास्त्र मध्ये ऋषिकेश पाटील प्रताप कॉलेज अमळनेर यांनी प्रथम तर ललित पाटील, पी. जी. कॉलेज, जळगाव यांनी द्वितीय बक्षीस मिळविले, बायोटेक मध्ये शितल चौधरी, के. बी. सी. उ. म. वि. जळगाव हिला प्रथम तर दानिश महमद, एम. जे. कॉलेज याने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. मायोक्रोबायोलॉजी मध्ये दीपिका पाटील हि प्रथम तर वासंतिका पाटील, एम. जे. कॉलेज हिने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळविले. मॅथेमॅटीक्स मध्ये कांचन झांबरे, पी. जी. कॉलेज हिने प्रथम तर प्रतीक्षा तातार, के. बी. सी. उ. म. वी. हिने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. स्टॅटीस्टीक्स मध्ये दीपिका इंगळे, पी. जी. कॉलेज हिने प्रथम तर मंजुषा पाटील प्रताप कॉलेज हिने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. विजेत्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व कॅश बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेसाठी डॉ. जे. एन. चौधरी, प्रा. जे. बी. जैन, प्रा. डी. डी. नारखेडे व प्रा. योगेश नारखेडे यांनी परीक्षक म्हणून काम केले. बक्षीस वितरण समारंभाच्या वेळेस व्यासपीठावर पी. जी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे डॉ. जे. एन. चौधरी, प्रा. जे. बी. जैन, प्रा. योगेश नारखेडे व समन्वयक डॉ. सारंग बारी उपस्थीत होते. सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून स्पर्धांचे नियोजन व उपयुक्तता या बद्दल आपले मत मांडले, त्यात प्रतीक्षा तातार, ऋषिकेश पाटील, ललीत पाटील, व दानेश शेख यांनी मते मंडळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेने करता महाविद्यालयांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.