<
निमजाई फाउंडेशनतर्फे औद्योगिक क्षेत्र पाहणी;एमआयडीसीतील ‘मयुरेश गारमेंट’ला दिली भेट
जळगाव- निमजाई फाउंडेशनतर्फे शासनाच्या कौशल्य विकास योजनेतंर्गत तरुणी तसेच महिला वर्गाला महागड्या फॅशन डिसाईंनिंगचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. फाउंडेशनतर्फेे अभ्यासमातंर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनींनी शुक्रवारी मयुरेश गारमेंट या कंपनीला भेट दिली. या भेटीत विद्यार्थीनींनी कंपनीत ड्रेस तयार करण्यापासून तो पूर्ण झाल्यावर होत असलेल्या पॅकेजिंगपर्यंतची माहिती जाणून घेतली.
निमजाई फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत औद्योगिक क्षेत्र पाहणीत एमआयडीसीतील मयुरेश गारमेंट या कंपनीला शुक्रवारी दुपारी भेट दिली. मयुरेश गारमेंटच्या संचालिका किर्ती वारके, निमजाई फाऊंडेशनच्या अध्यक्षा शीतल पाटील आणि सचिव भूषण बाक्षे यांच्यासह 50 पेक्षा जास्त विद्यार्थीनींची उपस्थिती होती. भेटीत विद्यार्थीनींनी कंपनीत अंकित कुमार यांच्याकडून एकाचवेळी 500 पेक्षा जास्त कपड्यांच्या कटींग करणार्या कटर मशीनची माहिती घेतली तसेच प्रात्यक्षिकही अनुभवले. यानंतर विद्यार्थीनींना अंकित कुमार यांनी कंपनीत कपडे तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्या अत्याधुनिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिलाई मशीनबद्दल माहिती दिली. यानंतर येथील कामगारांकडून ते करत असलेल्या कामाची माहिती दिली. यानंतर डे्रस तयार झाल्यानंतर त्याचे पॅकेंजिंगबद्दलही माहिती यावेळी देण्यात आली.
विद्यार्थीनींना रोजगारही देण्याची तयारी
अध्यक्षा शितल पाटील यांनी क्षेत्र भेटीसाठी मिळालेल्या संधीबद्दल कंपनीच्या किर्ती वारके यांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थीनींनी अभ्यासक्रमांपेक्षा प्रत्यक्षात काम कसे चालते याबाबत ज्ञान मिळाल्याचे वारके यांना सांगितले. यावेळी किर्ती वारके यांनी फाऊंडेशनमध्ये शिक्षण घेत असलेल्या ज्या विद्यार्थीनींना कंपनीत काम करण्याची तयारी असेल, त्यांना मानधन तत्वावर रोजगार देण्याची मनोदय व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किशोर पाटील, महेश पाटील, दिपक जावळे, विवेक जावळे, रुपम जावळे, कुणाल कोलते, शिक्षिका रंजना पाटील, हेमलता इंगळे, अर्चना पाटील, रुपाली पाटील, योगीता सपकाळे, भाग्यश्री चौधरी, पूनम चौधरी, नितू चौधरी यांनी परिश्रम घेतले.