<
जळगांव(डॉ धर्मेंद्र पालवे):-महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहता पक्ष वृद्धी आणि सत्तेत पक्ष टिकवण्यासाठी महिलांचा सहभाग राजकीय वर्तुळात केला जातो. कार्यकते वाढवणे, सामाजिक, राजकीय धार्मिक आणि विकासात्मक धोरणांवर आरोप प्रत्यारोप करण्यासाठी प्रसंगी युद्ध करण्यास स्त्री पात्राचा उपयोग करून घेणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे असे दिसून येते.सम्पूर्ण महाराष्ट्राला राजकीय वळण देणारा एकमेव जिल्हा तसेच सर्वात जास्त सत्ताधारी देणाऱ्या आमच्या या जळगाव जिल्ह्यात सुद्धा सत्ता मिळावी,राजकीय राजवट टिकावी, म्हणून किळसवाणा प्रकार केला जातो आणि तो म्हणजे स्त्री शक्ती व पात्र पुढे करणे होय.भ्रष्ट लाचार, वरिष्ठांच्या दबावात, सत्तेचं सोंग असणाऱ्या काही नेत्यांनी वराजकीय पुढाऱ्यांनी स्त्री पात्रांना समोर ठेवत आरोप प्रत्यारोप केलेली बरेच उदाहरणं देता येतील.माहिती अधिकार कार्य कर्ते आणि समाजसेवकावर अश्या प्रकारची खेळी खेळल्याची ताजी उदाहरणे देता येतील आणि हेच माणसं जळगावचा विकास, जळगाव चा सर्वांग काया पालट करण्यास व राजकीय धोरणास कारणीभूत ठरत आहेत हे सत्य नाकारता येत नाही.याचा परिणाम जनतेच्या भावनांवर,जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी च्या धोरणावर होतो, बुद्धीजीवी,समाजसेवी, समाजातील सुधारकावर सुद्धा काही अंशी परिणाम होतो.भ्रष्टाचार व सत्ता साठी पोकळ अश्वसनावर भर देण्यासाठी राजकीय खेळी म्हणून स्त्री पात्राचा उपयोग होतो ही बाब महत्वाची आणि लक्षात घेण्या जोगी आहे. त्याच बरोबर राजकीय सूत्र हलवणाऱ्याजळगाव जिल्ह्यात हे होतं हे ही तितकीच लाजिरवाणी बाब आहे हे सत्य नाकारता येणं शक्य नाही.