<
जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन ,उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा ‘उत्कर्ष २०१९-२०’ मध्ये कबचौउमविच्या संघास विविध विभागात पारितोषिके प्राप्त झाली.
छायाचित्रण – त्रुतीय पारितोषिक (मंगेश बाविसाने)
वक्त्रुत्व- त्रुतीय पारितोषिक(सारांश सोनार)
निबंध लेखन- द्वितीय पारितोषिक(गायत्री महाजन)
स्वरचित कविता – प्रथम पारितोषिक(लिना पाटील)
पथसंचलन – द्वितीय पारितोषिक (सांघिक)
समूहगीत- त्रुतीय पारितोषिक(सांघिक)
साहित्य विभागातून – सर्वसाधारण विजेतेपद
प्राचार्य डॉ. अतुल साळुंके फिरता चषक – साहित्य विभाग (सांघिक) प्राप्त झाला.
सदर संघात जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून ९ मुले व ९ मुली अशा एकूण १८ रासेयो स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. तर संघव्यवस्थापक म्हणून जळगाव येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील प्रा.डॉ.नितीन बडगुजर यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध १५ विद्यापीठांनी आपला उस्फुर्त सहभाग नोंदविला.
कबचौउमवि संघाच्या या घवघवीत यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील, प्र.कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य व उत्कर्ष चे कार्यवाहक श्री. दिलीपदादा पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य श्री.दिपक पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य व एन. मुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा. नितीन बारी, व्यवस्थापन परिषद सदस्य सौ. रत्नमाला बेंद्रे प्र. कुलसचिव प्रा. डॉ. बी. व्ही. पवार यांनी तसेच राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र शासनाचे राज्य संपर्क अधिकारी तथा विशेष अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंके, कबचौउमवि चे रासेयो संचालक प्रा. डॉ. पंकजकुमार नन्नवरे, स्पर्धा समन्वयक डॉ. वाल्मिक आढावे यांनी अभिनंदन केले.