<
जळगांव(प्रतिनिधी-डॉ.धर्मेंश पालवे):-जिल्ह्यात विविध बाबतीत नेहमी चर्चित असनासरे आणि वादग्रस्त असणारे जळगांव जिल्हा रुग्णालय म्हणून प्रचलित आहे.शासन दरबारी नवीन ध्येय आणि उद्दिष्ट समोर ठेवत शासनाने महाविद्यालय ही मजूर केले, आणि सुरू ही झाले.असे असताना मात्र रुग्ण सेवेत पाहिजे तसा फरक पडला नाही असं चित्र आहे.रक्त तपासणी,समुपदेशन केंद्र,महिला कक्ष ,नवजात मुलाचे वार्ड, सह अत्याधुनिक मशीनच्या उपलब्धतेने शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय जरी सुजलाम सुफलाम दिसत असले तरी मात्र अपुरे कर्मचारी,अनुभवी वृंद, आणि नियोजनाचा अभाव आजही दिसून येतो.आज सत्यमेव जयते च्या प्रतिनिधींनी या महाविद्यालयची भेट दिली असता, रुग्णांणी कथन केलेल्या काही बाबी विचार करण्यास भाग पाडत आहे. नाव नोंदणी करण्यास एक कर्मचारी असतो आणि गर्दी त्याच्या आटोक्या बाहेरची,ओ पी डी विभागात नंबर लावल्या वरून भांडणे होतात.तर रक्तलघवी तपासनीस हजर नसतो.त्याच बरोबर नेत्र तपासणी विभागात आज अलोट गर्दी दिसून आली ,वयोवृद्ध अबाल आणि आजाराणे बेजार असलेल्या रुग्णांना बसण्यास बाहेरील झाडांचा आधार घ्यावा लागतो.CT scan साठी लागणारे फॉर्म हे बाहेरून zerox वाल्या कडून विकत आणावी लागतात तर त्यासाठी चे डॉक्टर उपलब्ध नसल्याने रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळतात. Scan फिल्म नसल्याने हाती कागद घेऊन गंभीर आजार असूनही दिरंगायीने फिरावे लागते. अश्या अनेक अडचणी अजूनही दिसतात. काही रुग्णांणी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर वरील बाबीचा उलगडा केला।तर काहींनी न भिता आपली आप बीती कथन केली.जिल्ह्यातील राजकीय वर्तुळ आणि जिल्हा रुग्णालय समिती यावर वेळीच लक्ष देऊन सर्व समावेशक वैद्यकीय सेवा देण्यास भर देतील अशी आशा करण्यात का सार्थता आहे.यावरून वाटते की जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय चे ग्रहण कधी सुटणार .