<
जळगाव-(प्रतिनिधी) – येथील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
केसीई सोसायटीचे सदस्य डॉ.हर्षवर्धन जावळे , केसीई चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांना या प्रसंगी गौरविण्यात आले.
प्रत्येक इयत्तेतून , वर्गातून , शाळेतून सर्वप्रथम येणारे विद्यार्थी , विषयानुसार प्रथम येणारे विद्यार्थी , मंथन , एनएनएस ई , एमटीएस इत्यादी स्कॉलरशिप परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी , मार्च 2019 च्या एस एस सी शालांत परीक्षेत प्रथम येणारे विद्यार्थी या प्रसंगी गौरविण्यात आले.त्याचप्रमाणे कलाशिक्षक प्रवीण महाजन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ.हर्षवर्धन जावळे यांनी विद्यार्थ्यांना सकस आहार व आपले शरीर आपण सदृढ कशा प्रकारे ठेऊ शकतो या विषयी मार्गदर्शन केले. प्रसंगी शालेय समन्वयक के.जी.फेगडे , चंद्रकांत भंडारी , मानसशास्त्रीय सल्लागार माया काळे , मुख्या.रेखा पाटील , मुख्या.डी. व्ही.चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे व सुजाता फालक यांनी केले तर आभार मुख्या.रेखा पाटील यांनी मानले.