<
चाळीसगाव ;- जळगाव जिल्हा वनविभागाच्यावतीने चाळीसगाव वनक्षेत्र परिसरातील घोडेगाव परिमंडळात उपखेड स्टेट कॅम्प देवळी गावाजवळ आज 18700 झाड या लागवडीच्या शुभारंभ खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्य शासनाने 33 कोटी वृक्ष लागवड व वनविभागाच्या लोकसहभागातून वन्यजीव संवर्धन व संरक्षण प्रभावीपणे करण्याकरिता बदलत्या महाराष्ट्राची हरित पाऊलवाट या उपक्रमा अंतर्गत आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी खासदार उन्मेष पाटील प्रांताधिकारी शरद पवार तहसीलदार अमोल मोरे उपवनसंरक्षक दिगंबर पगार ,परिक्षेत्र अधिकारी धनंजय पवार, सहाय्यक उप वनसंरक्षक श्री फंड, सर्पमित्र राजेश ठोंबरे,, पंचायत समिती उपसभापती संजय पाटील, युवा मोर्चाचे कपिल पाटील, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ ,देवळी उपसरपंच अतुल पाटील, ज्येष्ठ पत्रकार सी सी वाणी ,आबासाहेब रणदिवे, शरद सुर्यवंशी , विनोद रणदिवे, विवेक रणदिवे, बाळासाहेब सुर्यवंशी , राजू पाटील, विजय पांगारे , सुनील रणदिवे, बाळू पाटील, प्रकाश पाटील, यांच्यासह वन महसूल व विविध विभागातील पदाधिकारी ग्रामस्थ, माध्यमिक शाळा व शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.