<
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मोठ्या घोेषणा करण्यात आल्या आहेत. करदात्याला दिलासा दिलेला असला तरी इतर क्षेत्रासाठी यंदाचा अर्थसंकल्प स्वप्नवत वाटत आहे. शेतकर्यांसाठी १६ कलमी कार्यक्रमाची घोषणा झाली असली तरी आधीच्या घोषणांचा यात कुठेही समावेश दिसत नाही. आरोग्य क्षेत्रासाठी ६९ हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली आहे. या घोेषणेची अंमलबजावणी झाली पाहीजे. अन्यथा निव्वळ घोषणा केली म्हणजे झाले असे नको. बँक खात्यातील रकमेसाठी विमा कवच पाच लाखांपर्यंत करण्यात आल्याने ठेवीदारांना दिलासा मिळाला असला तरी ज्या बँकांमध्ये घोटाळे झाले आहेत, अशा बँकांबाबतीत ठोस निर्णय दिसून येत नाही. एकुणच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील घोषणा कितपत पुर्ण होतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल अशी प्रतिक्रीया काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी दिली.