<
जळगाव : येथील पार्वती नगर गिरणा टाकी परिसरातील, पूजा अपार्टमेंट, मधील रहिवासी एकनाथ धुडकू भारंबे (वय 92) यांचे 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजता निधन झाले.
ते एम.आय.डी.सी.तील सेवानिवृत्त कर्मचारी रवींद्र भारंबे, कल्याण येथील डॉ. शशीकांत भारंबे आणि एम.एस.ई.बी. तील कर्मचारी दिनकर भारंबे यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, तीन मुली, सूना, नातू, पणतू असा परिवार आहे. ते ब्रह्माकुमारी विद्यालयाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी आणि राजयोेग प्रचार व प्रसारासाठी त्यांनी भरीव कार्य केले होते.