<
जळगाव-(प्रतिनिधी) – मनपा समूह साधन केंद्र क्रमांक 9 चे केंद्रप्रमुख डॉ.अशोक पुंडलिक सैंदाणे यांनी लिहिलेला बिजांकुर हा काव्यसंग्रह नुकताच रोटरी क्लब ऑफ गोल्डसिटी येथे रयत संदेश प्रकाशन जळगाव तर्फे प्रकाशित करण्यात आला.
बीजांकुर या काव्यसंग्रहात माणूस हा केंद्रबिंदू असून माणूस हा कसे वर्तन करतो , स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न सतत करीत असतो. त्याच्या भावना, व्यवहार , मूल्य यांचा कवीला आलेला अनुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे.गुपित , नाते , विसर्जन , कुरुक्षेत्र , शेतकरी , शिष्य जात , निसर्ग ,खान्देश माझा , शिष्टाचार , आत्महत्या अशा विविध विषयांवर कवीने उजेड टाकला आहे . डॉ.अशोक सैंदाणे यांनी या अगोदर अनेक विषयांवर लेख व काव्यलेखन केलेले आहे.
काव्यासंग्रहांचे प्रकाशन शिक्षणाधिकारी डॉ.डी. एम. देवांग यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला प्रसंगी डॉ.तुषार फिरके , संजय दहाड, राहुल कोठारी आदी उवस्थित होते .