<
जळगाव (हर्षल सोनार-शहर प्रतिनिधी) – असं म्हटलं जातं की आपण भारत या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात राहत आहोत. या लोकशाहीत सामान्य जनता ही सर्वश्रेष्ठ असते म्हणूनच ही संपूर्ण यंत्रणा आपल्यासाठी कार्यरत आहे.पण प्रत्यक्षात जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला असे दिसेल की सामान्य जनतेलाच या लोकशाहीत कवडीची किंमत नाही.
जसे आज सामान्य माणूस भरगच्च भरलेल्या रेल्वे ,बसने प्रवास करतो पण आपल्या सेवेत असलेले मंत्री यांना मात्र वातानुकूलित वाहने असतात.
आज सामान्य माणसाला कुठे काय दंगल, मोब लिंचींग , बॉम्ब स्फोट होईल याच्या दडपणाखाली तो आपलं जीवन जगत असतो. आपला पाल्य शाळेतून सुरक्षित येईल का नाही ? मार्केटमध्ये असताना गर्दीच्या ठिकाणी केव्हा घात होईल याची सदैव त्याच्या मनात भीती असते.
पण मंत्री जे आपल्या सुरक्षेसाठी असतात आपले ध्येय ,धोरणे निश्चिच करण्यासाठी, समाजाच्या विकासासाठी ज्यांची आपण निवड करतो ते मात्र मस्त सेक्युरिटी टीम घेऊन रूबाबात वावरता.
अजुन मला एक समजत नाही सामान्य जनतेतूनच निवडून आलेल्या मंत्र्यांना या जनतेपासूनच संरक्षण कसे पाहिजे ?त्यांच्या संरक्षणासाठी वाय, झेड ,झेड प्लस दर्जाची सुरक्षा का? सुरक्षेसाठी पोलिस त्यांचे वेतन ,त्यांच्यासाठी वाहन ,वाहनावरिल इंधनाचा वाढता खर्च कश्याला?तुम्ही सामान्यातुनच निवडून आलेत ना मग तुम्हाला आम्ही सर्वोच्च स्थान सत्ताधिकारी बनवतो मग तुम्ही आमच्या पासूनच का असुरक्षित वाटुन घेतात.का निवडून आल्यावर तुम्ही काही विशेष होतात ? का फक्त निवडून येणे पुरता तुम्ही सामान्य असल्याचा आव आणतात? हा दुजाभाव आमच्या सोबत का?
आणि जर तुम्हाला आमच्यापासून असुरक्षित वाटत असेल तर तुमच्या पगारातून तुम्ही सुरक्षा यंत्रणे वर होणारा खर्च स्वतः करा .आमच्या पासूनच बचावासाठी तुम्ही आमच्या पैशाची उधळपट्टी करता तुम्हाला जरा तरी लाज वाटते का?
त्यापेक्षा तुम्ही सामान्यांना आणि तुम्हालाही सुरक्षित वाटेल असं वातावरण बनवा ना? आम्ही त्यासाठीच तुम्हाला दिलंय..का फक्त आमच्यातुन निवडुन येवुन आमच्यावरच सुरक्षेचा भार टाकताय….