<
जळगाव-(जिमाका)-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीने जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगारासाठी अधिक मागणी असलेली क्षेत्रे निश्चित केलेली असुन त्यातील रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यासाठी “किमान कौशल्य विकास कार्यक्रम” या जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजनेंतर्गत उमेदवारांना मोफत अनिवासी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांनी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबतची माहिती मिळवणे, निवड झालेल्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थां इत्यादी विषयी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असावा. १५ ते ४५ वयोगटातील, प्रशिक्षणासाठी विहीत केलेली आवश्यक किमान शैक्षणिक पात्रताधारक असावा. रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये खालील अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला असुन लाभार्थी उमेदवारांना शासनामार्फत संपुर्णपणे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल.
एनसीव्हीटीचे अभ्यासक्रम :
१. बेसिक ऑटोमोटीव्ह सर्व्हिसिंग, टू व्हीलर, थ्री व्हीलर, 2. अकौंटींग, 3. इलेक्टीशियन डोमेस्टीक, 4. आर्क ॲण्ड गॅस वेल्डर, 5. असिस्टंट फॅशन सेल्स ॲण्ड शोरुम रिप्रेझेंटेटीव्ह, 6. होम फर्निशिंग, 7. फॅशन डिझाइन टेक्नॉलॉजी, 8. असिस्टंट फायर ऑपरेटर, 9. हॅन्ड एम्ब्रॉयडर, 10. टेलर (बेसिक सिविंग ऑपरेटर) 11. हॉस्पिटॅलिटी असिस्टंट 12. इलेक्ट्रीशियन इंडस्ट्रियल 13. अकौंट असिस्टंट युझिंग टॅली 14. डिजीटल कॅमेरा फोटोग्राफी 15. व्हिडीओग्राफी 16. बेडसाईड असिस्टंट 17. फार्मसी असिस्टंट 18. हेल्थ केअर मल्टीपर्पज वर्कर 19. टर्निंग 20. सेल्स पर्सन (रिटेल) 21. इंडस्ट्रियल सिक्युरिटी गार्ड, 22. स्टिचींग ऑपरेटर.
एसएससी – सेक्टर स्किल कौन्सिल चे अभ्यासक्रम :
प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर मुल्यमापन करुन प्रशिक्षणार्थ्यांना शासनाचे प्रमाणपत्र (SSC/NCVT) देऊन संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. (दूरध्वनी क्रमांक 0257-2239605) असे आवाहन अ. ला. तडवी, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.