जळगाव(प्रतिनिधी)- येथील प्रतीभा प्राथमिक विद्यालयात येथे शिक्षण घेणाऱ्या ३२७ विद्यार्थ्यांना पाय मोजे, इतर जीवनावश्यक साहित्य तसेच फराळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी रोटा किड्सची स्थापना देखील करण्यात आली. रोटरी क्लब जळगांव स्टार्सच्या वतीने जळगाव शहरात दुसरा रोटा किड्स स्थापित करण्यात आले. या प्रकल्पाला आर्थिक मदत रोटेरियन विशाल अग्रवाल व रोटेरियन धनराज कासट यांनी केली. यावेळी रोटरी स्टार्सचे अध्यक्ष सागर मुंडा, शाळेच्या मुख्याध्यापीका सौ.बोढरे, करण ललवाणी, पब्लिक कमिटी चेअरपर्सन जिनल जैन, धनराज कासट, रोहित तलरेजा, डॉ गोविंद तापडीया, सचिन बलदवा, पुनीत रावलानी, चेतन सोनी आदी उपस्थित होते. आभार शाळेचे मुख्याध्यापक सौ. एस. बोढरे यांनी मानले.