<
जामनेर-(अभिमान झाल्टे)-सोशल मीडियावर “वंदे मातरम”या घोषणे बाबत आक्षेपार्ह विधान व्हायरल केल्याने येथील तरुण शेख सईम मुल्लाजी याच्याविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपासून देशात CAA/NRC. बाबतीत वातावरण ढवळून निघाले असून या नागरिकत्व कायद्याचा काही ठिकाणी विरोधात तर काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे,आंदोलने केली जात आहेत.याच विषयाला अनुसरून सोशल मीडियावर देखील विविध प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. याच विषयास अनुसरून जामनेर येथे काही दिवसांपूर्वी येथील एका तरुणाने सोशल मीडियावर “वंदे मातरम” अशी पोस्ट शेअर केली होती, या पोस्टवर जामनेर येथील-शेख, सईम, मुल्लाजी. याने आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली.सदर शेख-सईम याने सोशल मीडियावर व्हायरल केलेले आक्षेपार्ह विधान तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आणि सर्व स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.शेख-सईम मुल्लाजी याने “वंदे मातरम” बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे जामनेर शहरासह तालुक्यातील वातावरण तापले असून कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे.शेख-सईम मुल्लाजी याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या म्हणून व सोशल मीडियावर आक्षेपार्ह, व अश्लील वक्तव्य व्हायरल केले म्हणून कलम-294, 295, (अ), आय. टी. कायदा कलम-67अन्वये शुभम माळी याच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक-प्रताप इंगळे हे करीत आहेत.