<
जामनेर-(प्रतिनिधी) -तोंडापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने तोंडापूर येथील अवैध धंदे, गावरान दारू कायमस्वरूपी बंद करण्यात यावे याचे निवेदन तहसीलदार जिल्हा अधिकारी व विविध ठिकाणी देण्यात आले तोंडापूर ग्रामपंचायत च्या ग्रामसभा दि २८ रोजी सरपंच प्रकाश सपकाळ याच्या उपस्थितत घेण्यात आली होती.
गावकऱ्यांनी सर्वानुमते त्यात दारु व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचि मागणी ग्रामस्थांनी करण्यात आली होती त्या ठरावाच्या प्रति व निवेदन जिल्हा अधिकारी व जिल्हा पोलिस अधिकारी पहुर पोलिस याना निवेदन देण्यात आले.तोंडापूर गावाची लोकसंख्या १८ हजार च्या जवळ पास आहे गावात हिंदू. मुस्लिम. जैन .मागासवर्गीय तडवि भिल्ल तसेच सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात परंतु गेल्या काही महिन्या पासून गावात बस स्थानक परिसरात तसेच गावातील इतर ठिकाणी देशी विदेशी गावठी दारु व इतर अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत पोलिसाकडे तक्रार केली असता तात्पुरते स्वरूपात बंद होते नंतर पुन्हा केले जाताना त्यामुळे गावात वाद विवाद होत असून हाणामारी छेडछानि सारखे प्रकार होत असून शांतता भंग होण्याचे प्रकार वाढत आहे. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात असल्याने जातीयवाद दंगल सदृश वातावरण होणाचि शक्यता नाकारता येत नाही. दारु मुळे लहानपणापासूनच मुले दारु च्या आहारी जात आहे. बसस्थानक परिसरात दारुड्या चा नेहमीच धुमाकूळ घालत असल्याने गावातील दारु सह अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावी साठी तोंडापूर येथील ग्रामस्थांनी तहसीलदार जामनेर पहुर पोलीस स्टेशन राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा अधिकारी याना निवेदन देण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थ राम अपार जितेंद्र पाटील पवन भुतेकर चेतन पाटील ईश्वर अपार दत्तात्रय दांडगे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग खिल्लारे जगन लांडगे विकास पाटील भरत कानडजे संभाजी गोतमारे सतीश बिऱ्हाडे ग्रामस्थ हजर होते.