<
मुंबई : वेब मीडिया, टीव्ही जनर्लिस्ट, असोसिएशन विधिमंडळ व मंत्रालय मुंबई ची मंत्रालयात व विधान भवन येथे स्थापना करण्यात आली असून यासाठी सन २००४ पासून पत्रकारिता क्षेत्रात अथक परिश्रम घेणारे निर्भीड पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
या असोसिएशन मध्ये महाराष्ट्रातील मंत्रालयात व विधीमंडळ येथे नियमियत वृत्तसंकलन करणारे विविध जिल्ह्यातील ऑनलाईन मीडियात काम करणाऱ्या अधिस्वीकृती एकूण ०९ पत्रकारांचा संचालक सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. आता पर्यंत ऑनलाईन मीडियासाठी अधिकृत कुठलीही संघटना नसून जेष्ठ पत्रकार श्री.अनिल महाजन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वानुमते महाजन यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे.
यावेळी मंत्रालय माहिती जनसंपर्क महासंचलनाय चे महासंचालक दिलीप पाढंरपट्टे व संचालक आंबेकर यांनी अनिल महाजन व इतर सदस्य यांचे अभिनंदन केले धर्मादाय आयुक्त यांनी नोंदणीकृत वेब मीडिया टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन विधिमंडळ व मंत्रालय या नावाचे अधिकृत सर्टिफिकेट दिले आहे. लवकरच मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब यांच्या उपस्थित राज्यसरकारने वेब मीडियासाठी पॉलिसी तयार करावी ही मागणी आणि पत्रकार बांधवांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी तसेच सर्व नवनियुक्त सदस्य यांचा एक अभिनंदन सोहळा कार्यक्रम मंत्रालय येथे लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले तसेच मंत्रालय व विधानभवन येथील पत्रकारासह राज्यभरातील वेब मीडियाच्या (पोर्टल) च्या संपादक व पत्रकार यांच्या पाठीशी भक्कम पणे ही असोसिएशन उभी राहील व अध्यक्ष म्हणून माझा सर्व पत्रकारांना पाठींबा राहील असे अनिल महाजन यांनी सांगितले.