<
चाळीसगाव-(प्रतिनीधी) – सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट आयोजित शिवरथ यात्रा साठी चाळीसगावातील सह्याद्री प्रतिष्ठान चे सदस्य व शिवप्रेमी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार घालून जय शिवाजी जय भवानी जय घोषात करत किल्ले शिवनेरी कडे रवाना झाले.
“शिवरथ यात्रा” हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशातील मानाचा पहिला पालखी सोहळा महाराष्ट्रात सुरु करून 9 वर्ष पूर्ण झाली 2020 मध्ये सदरं पालखी सोहळा 10 व्या वर्षात पदार्पण करत असून शिवरायांची स्मारक असलेल्या गड – किल्ल्यांच्या दुर्गसंवर्धन चळवळीचा प्रचार गावांमध्ये, शहरांमध्ये व्हावा या हेतूने ज्या गावामधून, शहरातुन सदरं पालखी मार्गक्रम करते त्या ठिकाणी पोवाडे, व्याख्याने, शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक असे अनेक कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून मोफत राबवले जातात. असे सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी सांगितले व सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी पुढे क्रुझर गाडीने शिवनेरी कडे रवाना झाले.