<
जळगाव (धर्मेश पालवे) – जिल्हा शासकीय कार्यालये, संस्था ,व आस्थापना कार्यालयात स्तनदा माता करीता स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्ष स्थापन करून सुविधा पुरवण्या बाबत महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी 2012 साली एक अध्यादेश शासनाच्या निर्णय नुसार काढला आणि तो 2014 साली पारित केला. विविध शासकीय कार्यालये, संस्था मध्ये 60×60 ची स्वतंत्र खोली उपलब्ध करून सर्व सोयीयुक असे दालन तयार करण्यावर आणि महिलाच्या सुविधेवर शासनाच्या खात्यातून पैसे खर्च करून त्यावर लक्ष ठेवणे अपेक्षित होते. मात्र जळगांव जिल्ह्यात वरील प्रमाणे कुठेही जिल्हा परिषद,नगरपालिका अश्या कोणत्याही महिला वर्दळीच्या ठिकाणी स्तनदा मातांना स्तनपान करन्यास हिरकणी कक्ष उपलब्ध नाही. जळगाव बस स्थानकात उपलब्ध असणाऱ्या हिरकणी कक्षात धूळ आणि साफ सफाई करण्याच सामान ठेवायचं ठिकाण असल्याचं दिसून आले, थोडक्यात राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकात हिरकणी कक्षाच्या बाबतीत प्रस्थापित पदाधिकारी टोलवाटोलवी करत आहे, दुर्लक्ष करीत आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे जेणे करून सुसूत्रता यावी.