<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील राज माध्यमिक विद्यालयात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या व सामाजिक परिस्थितीचे भान असलेल्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ जयश्रीताई महाजन या होत्या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आम्ही कसे घडलो, मुलांच्या जबाबदाऱ्या, होणाऱ्या चुका, ध्येयनिश्चिती, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुलांनी जी प्रश्न विचारले त्या प्रश्नांच्या संदर्भात मुलांना स्वतःच्या अनुभवातून योग्य ती उत्तरे दिली व विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या. यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या व शिक्षकांच्या आठवणी मुलांना सांगितल्या तसेच बदलता काळ विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्या याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ जयश्री ताई महाजन यांनी यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांचा आदर्श घेण्यास मुलांना सांगितले प्रसंगी मोहिनी वानखेडे, वैशाली झाल्टे, दिपाली गवळे, तुप्ती तायडे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पी डी नेहेते यांनी, तर आभार प्रदर्शन व्ही डी नेहेते यांनी केले.